ग्रामीण पत्रकार संघ व महादेव उप्पे यांच्या वाढदिवसानिमित्त आर्सेनिक अल्बम आयुर्वेदिक गोळ्याचे वाटप

    34

    ✒️(तालुका प्रतिनिधी)महादेव उप्पे(मो:-९४०४६४२४१७)

    हाणेगाव(दि.1मार्च):-येथे ग्रामपंचायत कार्यालयात आज दि.१/२/२०२१ रोजी पत्रकार संघटना व डॉक्टर असोशियन यांच्या वतीने महादेव उप्पे यांच्या ३९ वाढदिवसानिमित्त आर्सेनिक अल्बम आयुर्वेदिक गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे यावेळी डॉ.नाईक साहेबांनी अतिशय सखोल अशी कोरोना महामारी बद्दल माहिती सांगीतली यावेळी लोकांनी अतीशय गांभीर्याने विचार ऐकले व आपापली काळजी स्वतः घ्या म्हणून लोकांना उद्देशून सांगितले.यावेळी गावातील असंख्य नागरीकांना गोळ्या वाटप करण्यात आले व गोळ्याच्या संदर्भात सर्वांना माहिती सांगण्यात आले. व गोळ्या घेण्याच्या संदर्भात सुचना देण्यात आली.

    या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतचे उपसरपंच मुजीप चमकुडे पटेल व प्रमुख पाहुणे व आर्सेनीक अल्बमचे गोळ्या मिळवून देणारे मा.नानासाहेब मोरे डॉ. सुर्यकांत नाईक साहेब, डॉ.आनंद चिद्रावार ,राजु हंदीखेरे, हणमारेड्डी (सरपंच बिजलवाडी),योगेश मैलागीरे,प्रशांत पाटील मानुरकर, दिपक भाऊ संगमकर,रितेश थडके,राहुल मारकवाड, ग्रामपंचायत सदस्य उमाकांत पंचगल्ले, सदस्य वसंत आडेकर,व गावातील पत्रकार किशोर आडेकर,मोसीन मुजावर,महादेव उप्पे,अभिषेक उप्पे,दत्तात्रय पाटील खुतमापूरकर इत्यादींचा महादेव उप्पे यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी गावातील असंख्य नागरीक उपस्थित होते.