राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या माध्यमातून मिळाला देऊर खु गावाला ट्रॉस्फॉर्मर

    38

    ✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)

    धुळे(दि.2मार्च):- धुळे तालुक्यातील देऊर खु.!! येथील पाणीपुरवठा करणारी 25 केव्हिए क्षमतेचा ट्रॉस्फॉर्मर असल्याने व त्यावर लोड असल्याने नूतन सरपंच भूषण देसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधीकारी सतीश देसले यांनी सदर विषय किरण भैय्या पाटील(माजी जिल्हाध्यक्ष धुळे) व राजेंद्र चितोडकर(तालुका अध्यक्ष) अभियंता यांच्या कानी घातला 3 दिवसापासून जनरेटर ठेऊन टँकरने पाणी पुरवठा होत होता.

    सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सतत 3 दिवस कार्यकारी अभियंता भामरे साहेब,डेप्युटी इंजिनियर चव्हाण साहेब,सहाय्यक अभियंता चव्हाण साहेब व देऊरचे सहाय्यक अभियंता बेंद्रे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यांनी आज रोजी 25 च्या ऐवजी 63 केव्हिए चा ट्रॉस्फॉर्मर मंजूर करून नवीन ट्रॉस्फॉर्मर आजच्या आज उपलब्ध करून सदर प्रश्न निकाली काढला.देऊरचे सरपंच भूषण देसले, सतीश देसले व सर्व ग्रामस्थांनी सर्व अभियंत्यांचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार व्यक्त केले