भावसार युवा एकता महिला आघाडीचा अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा

    33

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    चंद्रपूर(दि.3मार्च):-रामाळा तलावाच्या संवरक्षणार्थ बंडू धोत्रे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर, व अजय बहुउद्देशीय संस्था यांनी पाठिंबा दिला जिल्हाध्यक्ष योगिता धानेवार शहर अध्यक्ष अभिलाषा मैंदळकर छाया बरडे कमल अलोने प्रीती लाखदिवे वैशाली भागवत कविता भागवत स्वाती घोटकर प्रणिता बोबडे व इतर महिला उपस्तीत होत्या,बंडू धोत्रे म्हणजे सामाजिक व्रताला वाहून घेणारे एक थोर समाज सेवाकच म्हणावे लागेल त्यांच्या हातून अनेक समाज सेवेचे कार्य झालेले आहे.

    चंद्रपूरच्या सुंदरतेकरिता,पर्यावर्णकरिता,आरोग्याकरिता,वसुंधरा बचवकरिता,वन्यप्राण्यांच्या बचवकरिता,पर्य तनाकरिता,प्रदूषणाकरिता,जठपुर गेट वाहतूक अडचणी संदर्भात व इतर समस्या करिता अनेकदा आंदोलने केली,त्यांनी केलेल्या कामाला यशही आले या अन्नत्याग आंदोलनातही येईल त्यांनी समाजाच्या सहभागाने स्वच्छता मोहीम हाती घेतली शहारासभोवताल किल्ला परकोट स्वच्छ केला याची नोंद देशपातळीवर घेण्यात आली व ते एकमेव व्यक्ती आहे त्यांनी चंद्रपूर चे नाव देशपातळीवर चमकविले, अजरामर केले आज तीच व्यक्ती रामळा तलाव बचावा करिता अन्नत्याग आंदोलन करीत आहे बंदुभाऊ चंद्रपूरची जनता तुमच्या पाठीशी आहे.आज आंदोलनाला 12 दिवस होऊनही शासन,प्रशासन,प्रतिनिधी ना अजूनही जाग आली नाही काय ?ज्या तलावाने चंद्रपूर वासी ना पाणी दिलं आरोग्य दिलं रोजगार दिला सोंदर्य सुध्दा भरभरून वाटलं, तोच तलाव समस्या ग्रस्त झालेला आहे,सभोवताल अतिक्रमणाचा विळखा बसला आहे.

    त्यात तीन छोटे नाले व एक मोट्या नाल्याचा प्रवाह सोडल्या जात आहे त्या मुळे तलावातील पाणीदूषित होत आहे, प्रदूषण वाढले व त्यामुळे मासोळ्या मृत पावत आहे पर्यायाने मासेमारी करणाऱ्या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे नाल्यामुळे बाहेरील माती साठल्यामुळे तलावातील पाणी कमी होत आहे सद्या रामळा तलावच चांद्रपूरकरांसाठी संजीवनी आहे हआज तोच मृत अवस्थेत आहे तलाव बाचावकरिता प्रशासन,पदाधिकारी लक्ष देतील काय?बहत्येक संघटना व संपूर्ण चंद्रपूर वाशी आपल्या पाठीशी आहे चंद्रपुरात गोंडकालीन रामळा तलाव,गडकोट किल्ला,माता महाकाली मंदिर,अंचलेश्वर मंदिर असल्यामुळे चंद्रपूर पर्यटन स्थळ घोषित करावे याची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,प्रदूषण नियामक मंडळ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.रचनात्मक,अहिंसक,सामाजिक आंदोलनाला भीती नसते विजय निश्चित आहे.