स्वागत समारंभ कार्यक्रमात ओबीसी जनगणना जनजागृती

27

🔸परिणय पत्रिकेत तेरा महापुरुषांच्या प्रतिमेसह थोर विचारांची मांडणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.3मार्च):-परिणय(लग्न सोहळा)म्हटले की ते दोन जीवांचा मिलनाचा एक व्यासपीठ,दोन कुटुंबाना एकत्र आणून गुण्यागोविंदाने जगण्याची रीत दाखविते,ही एक कौटुंबिक अनंत काळापासून चालत आलेली परंपरा आहे.वरील परंपरा कशी स्थानापन्न करावी ही जोडप्यांची व कुटुंबाची तारेवरची कसरत आहे.लग्न करणे आहे म्हणून लग्न जुळला ,पत्रिका काढल्या,कार्यक्रम पार पडलं,आता मी या कर्तव्यातून सुटलो ही भावना काही प्रत्येक परिवाराची राहते,पण असे काही परिवार आहेत की आमचे लग्न हे कर्तव्य म्हणून पार पाडत आहोत ही भावना न ठेवता आमचं कौटुंबिक व सामाजिक देणं लागत अशी भावना जोपासून जे पारंपरिक कर्तव्ये आगळ्या- वेगळ्या प्रकारे पण जनजागरण, मार्गदर्शन करून कर्तव्य पार पाडतात असे कुटुंब एखादेच असतो.

पंचांग,मुहूर्त,भट्ट,हुंडा अश्या कालबाह्य झालेल्या वैचारिक बाबींचा नाकारून वैवाहीक जीवनास सुरुवात करणारे ब्रम्हपुरी येथील गोंडाने परिवाराचे उपासक आयु.अँड.आशिष स्मृतिशेष शिवदास गोंडाने ब्रम्हपुरी यांचा विवाह आयु. केश्वीनी /सोनू आयु. दिवाकरजी लोखंडे अऱ्हेरनवरगाव दि. 28/02/2021 सकाळी 11:30 वाजता अऱ्हेरनवरगाव येथे झाला. त्यानंतर त्यांनी कोरोना चे रुग्ण आढळत असल्यामुळे सोशल डिस्टन चे पालन करून कार्यक्रम घेतला. दि. 01/03/2021 ला सायंकाळी ब्रह्मपूरी येथील दुर्गा मंगल कार्यालयात स्वागत समारंभ कार्यक्रम केले. त्या कार्यक्रमात त् काही राजकीय, सामाजिक व पत्रकार बंधूंनी ओबीसी जनगणना जनजागृती केली.

यावेळी वर अँड. आशिष व वधू सोनू तसेच पत्रकार गोवर्धन दोनाडकर, पत्रकार शिवराज मालवी, राहुल मैंद, नूतन प्रधान, प्रशांत डांगे, विनोद चौधरी व अन्य मान्यवर उपस्थित होते. मंगल परिणय सोहळ्याच्या पत्रिकेतील 13 महापुरुषांच्या प्रतिमेची मांडणी करून त्यांचे थोर विचारांनी संपुर्ण पत्रिका छापून जनजागृतीचा नवा पायंडा उभारला दिसत आहे.
या पत्रिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जनगणना 2021 मध्ये OBC (VJ /DNT /NT /SBC )चा कालम नाही म्हणून आमचा जनगणनेला सहभाग नाही. ओबीसी जनगणना अकरा फायदे कोणत्या आहेत. व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार सांगितले की,”कष्ट आणि यातना सोसण्यास तयार असल्याशिवाय कोणताही मागासवर्गीय माणूस मोठेपण प्राप्त करू शकत नाही”.

अश्याप्रकारे बोधिसत्व गौतम बुद्ध यांची नैतिक शिकवण,संत गाडगे महाराज यांचे दहा कलमी संदेश,महात्मा जोतिबा फुले यांचे विचार,लोकनायक बिरसा मुंडा,संत कबीर,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे,छत्रपती राजश्री शाहू महाराज,वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत तुकाराम,छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ यांच्या प्रतिमांची मांडणी करून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहेत व परिवर्तन करण्याचे कार्य करीत आहेत.।त्याच बरोबर 2021 जनगणना होणार आहे त्यात ओबीसी ची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी जातीनिहाय जनगणना झाल्याने कोणते फायदे होऊ शकतात हे उपासक आणि उपाशिका एक पोस्टर हातात घेऊन जनजागृती करीत आहेत.
वर अँड.आशिष व वधू सोनू याचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.