चंद्रपूर मधील विद्यापीठ – विद्यार्थी सहायता केंद्र जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विकासाकरिता मैलाचा दगड ठरणार

    31

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    चंद्रपूर(दि.3मार्च):-चंद्रपूर येथे सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थी सहायता केंद्र सुरू केल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करते आहे.विद्यापीठ स्थापनेपासून पूर्ववत चालू करण्यापर्यंत असंख्य अडचणींचा सामना विद्यापीठ व विद्यार्थ्यांना करावा लागला आणि तो सुरू पण आहे. या करिता अभाविप ने विद्यार्थी समस्या वेळोवेळी विद्यापीठ प्रशासन समोर मांडून त्या सोडवल्या. प्रसंगी निवेदन, चर्चा, आंदोलन,दबाव तयार करून विद्यापीठास जाग आणून विद्यापीठाच्या विकासात योगदानाच दिलंय.दोन जिल्ह्याकरिता निर्मित झालेल्या गोंडवाना विद्यापीठाची स्थापना यातील अभाविप ची प्रमुख मागणी म्हणजे विद्यापीठाच्या विद्यापीठ उपकेंद्र हे चंद्रपूर ला सुरू करण्यात यावे. शैक्षणिक क्षेत्रातील कोणतेही काम राहल की ते गडचिरोली ला जावे लागायचे.

    त्यात वेळ, मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागायचा, शैक्षणिक वर्तुळातून विद्यार्थ्यांची सातत्याने मागणी होती की उपकेंद्र हे चंद्रपूर ला सुरू करण्यात यावे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने व अभाविप सिनेट सदस्य यांनी सिनेटच्या माध्यमातून व अभाविपने वेळोवेळी याकरिता निवेदने चर्चा, आंदोलन केली. 2016 मधील विद्यापीठावरील आंदोलन, यांनातर सतत आंदोलने, सिनेट बैठक उधळली, कुलगुरू व शिक्षण मंत्र्यांची गाडी अडवणे. याचीच फलश्रुती म्हणून विद्यापीठाने यावर्षी विद्यार्थी सहायता केंद्र हे सप्टेंबर 2020 मध्ये झालेल्या सिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. व या केंद्राचे स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, चंद्रपूर येथे मा.कुलगुरू डाँ श्रीनिवास वरखेडी सर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करते आहे.