बजेट अधिवेशन मार्च2021

32

माननीय विरोधी पक्षनेते यांनी कोविड-19 मधील आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराची भीषणता,उदाहरणे देऊन विधिमंडळ अधिवेशनात भाषण करताना दि2 मार्च 2021 ला मांडलीत. यात तथ्य असावे असे प्रथम दर्शनी वाटते. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निरपेक्ष चौकशी करण्याची गरज आहे. मीडिया मध्ये तपशील आला आहे.

मला आठवते, 26 नोव्हेंबर 2015 ला नागपूर च्या यशवंत स्टेडियम मध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला. तीन- चार तासाच्या कार्यक्रमावर 1कोटी.88 लाख रुपयांचा खर्च झाला. संविधान दिवस साजरा करण्यात ही काही अनावश्यक खर्च आणि त्यात भ्रष्टाचार होत असेल तर ?

तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमांवर वारेमाप खर्च झाला. अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला अशी तक्रार मी स्वतः 2016 मध्ये सचिव सामाजिक न्याय आणि मुख्यसचिव यांचेकडे केली होती. मुख्यसचिव यांचे निर्देशानुसार ,सचिव सामाजिक न्याय यांनी आयुक्त समाज कल्याण यांना चौकशी करायला सांगीतले. पुन्हा पुन्हा पत्र लिहिले, RTI अर्ज केला. 2016 पासून चौकशीचे काय झाले अजूनही समजले नाही. बार्टी ,समता प्रतिष्ठान च्या कारभाराची चौकशी हा ही मुद्धा अनेकदा मांडला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाचा वापर होऊन असे होणे अयोग्य आहे.

केलेल्या आरोपात तथ्य असूनही चौकशी होत नसेल ,कार्यवाही होत नसेल तर काय उपयोग?
दि 15 मार्च2020 च्या माननीय मुख्यमंत्री यांचेकडील बैठकीत केलेल्या सादरीकरणात हा मुद्धा मांडला होता. वर्ष होत आले. अजूनही विषय आहेत. त्याबाबतची दि 20 .02.2021ची पोस्ट “आमची अपेक्षा…अधिवेशनात सरकारने निर्णय घ्यावा ” मीडियात आली आहे.

” भ्रष्टाचार आणि जातीयवाद ” च्या वृत्तीमुळे शासन प्रशासन ची सामाजिक न्यायाची चौकट खिळखिळी होऊ लागली आहे. हा लोकशाहीला मोठा धोका आहे. लक्षात घ्यावे लागेल, सरकार कोणत्याही पक्षाचे असो. संविधानाची नीतिमूल्ये रुजविण्याची जबाबदारी सरकारची आहे, प्रशासनाची आहे, सनदी अधिकाऱ्यांची आहे. न्यायाची अपेक्षा करू या.

✒️लेखक:-इ झेड खोब्रागडे(मो:-9923756900)