गडपिपरी प्राचिन विहीरीवर पुरातन प्रेमी व गावक-यांचे आंदोलन- पुरातन विहीरी नष्ट करण्याचा डाव

44

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमुर(दि.3मार्च):- भिसी पासुन चार कि. मी अंतरावर असलेल्या गडपिपरी मार्गावर प्राचिन पाय-याची बावळी विहीर आहे. या गावाला एेतिहासिक वारसा लाभल्याने या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांनी पुरातन विभागाकडे वारंवार निवेदन देऊनही लक्ष दिले नाही. त्यामुळे या विहीरी चे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या विहीरी चे दगड निघाले असून विहीर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

चिमुर तालुक्यातील इतिहास नष्ट करण्याचा डाव असल्याने पुरातन प्रेमी व गडपिपरी येथील गावकऱ्यांनी प्राचिन विहीरी वर आंदोलन करण्यात आले.

ह्या विहीरी गौंड कालिन असल्याचे बोलले जात आहे. चिमुर तालुक्यातील चारही विहीरी चे संवर्धन होणे गरजेचं आहे. ह्या विहीरी ला पाय-या आहे. त्यामुळे अनेक प्रवासी या विहीरी कडे बघुन जातात. त्यामुळे या विहीरी चे आकर्षण वाढले आहे. या विहीरी चे संवर्धन व एेतिहासिक ठेवा नष्ट होउ नये यासाठी पुरातन प्रेमी व गावकऱ्यांनी आंदोलन केले

यावेळी कवडू लोहकरे, उपसरपंच सुधाकर वाकडे , ग्राम पंचायत सदस्य योगेश करारे, मोहन सातपैसे, रविंद्र एकवनकर, प्रविण गारघाटे, अनिल पाटील, दंदु एकवनकर उपस्थित होते.