हाताची मेहंदी सुकण्या अगोदरच नवविवाहितेचा मृत्यू

72

✒️तालूका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७.

देगलूर(दि.3मार्च):-तालुक्यातील मरतोळी येथील मराठवाडा नेता पेपरचे प्रतिनिधी मा.दादाराव बेळीकर यांनी दि.२१/२/२०२१ रोजी आपली मुलगी श्रेया दादाराव बेळीकर हिचा लग्न थाटामाटात करून दिला,पण नियतीला मान्य नसल्यामुळे विवाहाच्या नवव्या दिवशीची रात्र हि काळरात्र ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.हा नियतीचा खेळ नुकत्याच सासुरवाशीण झालेल्या मरतोळी येथील श्रेया बेळीकर हिच्या नशिबी आला.

सात जन्माच्या फेऱ्या पूर्ण करून नव्या जीवनाची सुरूवात करण्या आधीच नियतीला मान्य नसलेल्या काळाने या स्वप्नाची राख रांगोळी झाली.मरतोळी येथील दादाराव बेळीकर यांची कन्या श्रेया दादाराव बेळीकर (वयः१९ वर्ष) या नववधूचे कर्नाटकातील सिद्धेश्वर विठ्ठलराव मडिवाळ रा.सुंदाळ ता.औराद जि.बिदर यांच्यासोबत रविवार दि.२१/२/२०२१ रोजी विवाह सोहळा संपन्न झाला.

मात्र हातावरच्या मेहंदीचा लाल रंग असतानाच लग्न झालेल्या नवव्या दिवशी सासरी सुंदाळ येथे सोमवारी (दि.१/२/२०२१) रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास गाढ झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने श्रेयाचा म्रत्यु झाला.अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे सासर व माहेर अशा दोन्ही ठिकाणच्या गावात मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.नऊ दिवसापुर्वीच मरतोळी येथेथी ग्रामस्थांनी श्रेयाला आनंद आश्रूनी नव्या संसारासाठी शुभेच्छा देऊन पाठवणी करण्यात आली.परंतु नऊ दिवसात घडलेल्या या दुःखद घटनेने श्रेयाच्या कुटुंबीयासह गावक-यांच्या डोळ्यांना अश्रूचा पाझर फूटला आहे.