रेतीच्या ओव्हर लोड हायवाने केली वाहतुकीची कोंडी

31

🔺रेतीच्या ओव्हर लोड वाहनाकडे आर. टी. ओ. चे दुर्लक्ष

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.3मार्च):- शहरातील नांदेड रोडवर असणाऱ्या रेल्वे फाटकाजवळ रेतीचा ओव्हर लोड हायवाचे पाटे तुटल्याने सकाळी आठ वाजल्यापासून तब्बल तिन तास येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. महामंडळाच्या बस ही तीन तास उशीराने धावल्या
महामार्ग पोलीसांनी वाहतुक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.तीन तासानंतर वाहतु एका साईड ने चलु करुन काही प्रमाणात प्रवाशानी सुटकेचा श्वास घेतला. सध्या तालुक्यात वाळु धक्क्याचे लिलाव झाले आहेत. आणी वाळु माफिया वाहनात ओव्हर लोड वाहतुक करताना हा प्रकार घडला आहे.

पण आर टी ओ मात्र ओव्हर लोड वाळु च्या वाहनावर मेहरबान आहेत का असा प्रश्न नागरीक या निमित्ताने विचारत आहेत. आता ते वाहन हटवले जाईल पण त्या वाहनात क्षमतेपेक्षा वाळु जास्त आहे का याचा पंचनामा करण्यासाठी मात्र अद्याप तरी आर टी ओ आले नाहीत. तर हे वाळु माफीया आपल्या वाहनाची नंबर प्लेट खोडुन टाकताना दिसत आहेत कोणत्याच वाळु वाहतुक करणार्‍या वाहनाला नंबर प्लेट नसते असली तर ती खोडलेली असते याचे गौडबंगाल काय आहे हे मात्र समजले नाही.या वाळु च्या हायवाने चार ते पाच किलोमीटर च्या वाहनांच्या रांगा लावल्या होत्या. विद्यार्थी जेष्ठ नागरिक. महीला व लहान मुलांना चार ते पाच किलोमिटर पायपीट करावी लागली. आता या ओव्हर लोड वाळु वाहतुक करणार्‍या हायवावर आर टी ओ कारवाई करणार की टोलवाटोलवी टोलवी करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे