कुंडलवाडी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी लक्ष्मीकांत येपूपवार यांची निवड

    66

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-99706313325

    बिलोली(दि.4मार्च):- तालुक्यातील कुंडलवाडी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी लक्ष्मीकांत येपूरवार यांची निवड झाली असुन दि.३ मार्च रोजी बाजार समितीमध्ये तालुका सहायक निबंधक रमेश कांबळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली असुन सचिव लक्ष्मणराव सोमशेट्टे हे ३ मार्च २०२१ रोजी सेवानिवृत झाल्याने रीक्त असलेल्या जागेवर कुंडलवाडीचे भुमिपूत्र लक्ष्मीकांत येपूरवार यांची सचिवपदी निवड करण्यात आल्याची माहीती तालुका सहायक निबंधक रमेश कांबळे यांनी दिली आहे.

    लक्ष्मीकांत येपूरवार यांनी २५ सप्टेंबर २००५ रोजी निरीक्षक पदावर रूजू झाले होते.३ मार्च २०२१ रोजी सचिवपदी निवड करण्यात आली. लक्ष्मण सोमशेट्टे यांना निरोप देण्यात आला तर येपूरवार यांनी पदभार स्विकारला. यावेळी तालुका सहायक निबंधक रमेश कांबळे,लक्ष्मणराव सोमशेट्टो,दिगांबर भालेराव आदी उपस्थित होते.येपूरवार यांची सचिवपदी निवड झाल्यामुळे गाव व परीसरातुन तसेच त्यांच्या मित्र व परीवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.