कु.पुनम कुथे यांना “स्व. इंदिरा गांधी सेवारत्न पुरस्कार _२०२१” प्रदान

28

🔹गोल्डन केअर क्लब, बंगळूर (कर्नाटक) मार्फत ऑनलाइन पुरस्कार सोहळा संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.8मार्च):-दि.8 मार्च 2021 रोजी सोमवारला जागतिक महिला दिन.हा दिवस संपूर्ण जगामध्ये विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. परंतु, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्षी सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास सर्वत्र बंदी घालण्यात आली आहे.

त्यामूळे, कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील नावाजलेली “गोल्डन केयर क्लब” संस्थे मार्फत 8 मार्च 2021 ला दुपारी 12 वाजता, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, झुम मीटिंग ऍप द्वारे ऑनलाइन पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या पुरस्कार सोहळ्यात, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीच्या कु.पुनम नानाजी कुथे (वय-26) यांना समाजपयोगी कार्य केल्याबद्धल मागील 4 वर्षाचा कार्य अनुभव पाहता, त्यांना “स्व.इंदिरा गांधी_ सेवारत्न पुरस्कार-2021” हा राष्ट्रीय पुरस्कार आनलाईन स्वरूपात प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्कराबद्धल जिल्ह्यात त्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे.

हा पुरस्कार आपल्या भारतामधून, फक्त 50 महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्धल देण्यात आला आहे, असे बंगळूर गोल्डन केयर क्लबच्या शिष्टमंडळांनी सांगितले