रण मोचन येथे ग्रामीण जीवनोन्नती वर आधारित तीन दिवसीय कार्यक्रम

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.8मार्च):-महाराष्ट्र शासनाच्या तालुका अभियान व्यवस्थापन पी आय पी गरीब कुटुंब ओळख प्रक्रिया मार्फत तसेच ब्रह्मपुरी पंचायत समिती ग्रामीण जीवोन्नती अभियान अंतर्गत रनमोचन येथील गोदावरी महिला ग्राम संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील जुनी बालवाडी केंद्रात रविवारला आज दिनांक 7 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम घेण्यात आला असून हा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे.

ह्या तीन दिवसीय चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतच्या सरपंच नीलिमा राऊत उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सदाशिव ठाकरे ग्रा प सदस्य संजय प्रधान घनश्याम मेश्राम मंदा सहारे कोमल मेश्राम अश्विनी दोनाडकर गोदावरी महिला संघाचे अध्यक्ष रेवता मैद सचिव माधुरी रासेकर कोषाध्यक्ष दुर्गा भुरके तर तालुका अभियान व्यवस्थापन उपाध्यक्ष बी एम राऊत खेड मक्ता चौगान विभागाचे सीसी सायत्कार बि एल एम बगमारे उपस्थित होते.

यावेळी बचत गटाच्या महिला व गोदावरी ग्राम संघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सदर कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने चालणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहेत यातच मशाल पेटवणे गावातील गरीब कुटुंबातील अति दुर्बल घटकातील मोडणाऱ्या कुटुंबाचा सर्वे ही होणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उषा बनकर कृषी मित्र सुलभा प्रधान यांच्यासह ग्राम संघाच्या महिलांनी सहकार्य लाभणार आहे.