मागासवर्गीय वसाहतीतील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नगरपालिकेला टाळे ठोकणार– धर्मराज लोखंडे

34
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.9मार्च):-शहरातील मागासवर्गीय वसाहतींना आठवड्यातून एक दिवस व इतर विभागाला चार दिवसातून पाणीपुरवठा देणाऱ्या म्हसवड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना स्मरण पत्र देताना मानवी हक्क अभियान जिल्हाध्यक्ष धर्मराज लोखंडे यांनी येत्या सोमवारपासून म्हसवड शहरातील सर्व विभागांना समान पाणीपुरवठा चार दिवसात पूर्न क्षमतेने न केल्यास मंगळवारी म्हसवड नगरपालिकेला टाळे ठोकणार असे मुख्याधिकारी यांना सांगितले आहे. आज पर्यंत मागासवर्गीय समाजाला नगरपालिका प्रशासन यांचेकडून जाणून-बुजून पाणीपुरवठा तसेच सफाईसाठी सफाई कामगार झाडू मारण्यासाठी मागासवर्गीय वसाहतीमध्ये येत नाही त्यामुळे त्या-त्या वसाहतींमधील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. असे इथून पुढे खपवून घेतले जाणार नाही पाणीपट्टी व इतर सर्व कर समान असताना मागासवर्गीयांवर अन्याय का केला जातो याचा जाब विचारणार आहे.

धर्मराज लोखंडे म्हणाले गेल्या अनेक वेळा मुख्य अधिकारी यांना पत्राद्वारे लेखी, तोंडी भेटून विनंती करून सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात याची गंभीर दखल म्हसवड मधील मागासवर्गीय वसाहतीतील तरुणांनी घेतली आहे इथून पुढे सर्व सोयी गावाप्रमाणे व इतर विभागाप्रमाणे मिळाल्या नाही तर नगरपालिका कार्यालयास सर्वजण एकत्र येऊन टाळे ठोकणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी निवेदन देताना धर्मराज लोखंडे, आरपीआयचे कार्यकर्ते महेश लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ लोखंडे, बाळासाहेब लोखंडे, वंचित बहुजन आघाडी चे युवा तालुकाध्यक्ष रंजीत सरतापे, संघटक अजित साठे, माजी नगरसेवक अंगुली बनसोडे, भीमराव सरतापे, शंकर लोखंडे, मिलिंद लोखंडे, प्राध्यापक राजेंद्र माने सर, व इतर कार्यकर्ते यावेळी नगरपालिका कार्यालयात उपस्थित होते.