स्त्री ही देशाचा आधारस्तंभ आहे- दीपक पंधरे

    40

    ?टेकेपार येथे जागतिक महिला दिन

    ✒️सुयोग डांगे(विषेश प्रतिनिधी)मो:-8605592830

    चिमूर(दि.10मार्च):- पंचायत समिती अंतर्गत जि. प. उच्च प्राथमिक शाळा,टेकेपार येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.जागतिक महिला दिनानिमित्त टेकेपार गावातील सर्वात जास्त शिकलेली महिला सौ. ताराबाई देवतळे यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक पंधरे होते.प्रमुख अतिथी मुख्याध्यापक किसन कुमले,किशोर मेश्राम ,मिलिंद रामटेके,शामदेव कुरडकर उपस्थित होते.उपस्थितांनी जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले.महिलांनी शिकून कुटूंबाचा,समाजाचा,देशाचा विकास करावा,स्त्री ही देशाचा आधारस्तंभ आहे असे प्रतिपादन दीपक पंधरे यांनी केले.

    कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रविंद्र उरकुडे यांनी केले.कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी उपस्थित होत.