जागतिक महिला दिनानिमित्त परळी येथे बचत गटांना 35 लाख रुपये कर्ज वाटप

    93

    ✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

    परळी वै(दि.10मार्च):- उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटाच्या विकासात्मक सक्षमीकरणासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब विकास निधी कमी पडू देणार नाहीत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते नेते अजय मुंडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महा समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.

    परळी पंचायत समिती सभागृहात घेतलेल्या कार्यक्रमात तालुक्यातील बचत गटांना 35 लक्ष रुपये कर्ज प्रतिधिनिक स्वरूपात वाटप करण्यात आले असून, सदर गटांना एकूण 4 कोटी 21 लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे हे उपस्थित होते.

    अजय मुंडे पुढे बोलतांना म्हणाले, ‘पालकमंत्री ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शननानुसार बचत गटांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.’ यावेळी श्री. अजय मुंडे यांनी जागतिक महिला दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

    यावेळी कार्यक्रमात बचत गटांना विविध उद्योग व्यवसायासाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परळीचे शाखा व्यवस्थापक अरविंदकुमार बदने, मोहा शाखा व्यवस्थापक नाटकर, आयसीसी बँकेचे श्रीनिवास नरवाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर उमेद अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँक सखी, सीआरपी, कृषीसखी सीटीसी व प्रभाग संघ व्यवस्थापक केडरचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमाला उपसभापती जानीमिया खुरेशी, गटविकास अधिकारी संजय केंद्रे व सदस्य मोहन सोळुंके,सटवाजी फड,वसंतराव तिडके, मोहनराव आचार्य, भरतराव सोनवणे, महिला विकास अधिकारी रोडे मॅडम,पंडित मॅडम, इत्यादी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक सचिन हरणावळ समन्वयक शिल्पा बुकलवार यांनी केले व कार्यक्रमाचे आभार कुणाल मुंडे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.