परळी पंचायत समिती कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा उपसभापती जानीमिया कुरेशी यांच्याकडून गौरव

36

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वै(दि.10मार्च):-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परळी पंचायत समिती कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार व गौरव उपसभापती जानीमिया कुरेशी यांच्या हस्ते संपन्न झाला.

परळी पंचायत समिती अधिकारी वर्गाबरोबरच महिला कर्मचारी सुद्धा आपलं कर्तव्य चोकपणे बजावत असतात अशा या कर्मचारी महिलांचाही सन्मान गौरव व्हायला हवा म्हणुन पंचायत समिती कार्यालयात एका छोट्या खानी कार्यक्रमात परिचर श्रीमती धूमाळ ए.एस., श्रीमती माने जी.एच., क.स.श्रीमती सोनवणे आर.आर., श्रीमती घाटोळज पी.व्ही., श्रीमती डोळे एस.जे. या महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प.स. सदस्य कार्यालयीन कर्मचारी अदी अनेक मान्यवर उपस्थित होते