सम्यक बौद्ध विहारात जागतिक महिला दिन साजरा

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

उमरखेड(दि.10मार्च):- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बौद्ध विहारात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

तथागत गौतम बुद्ध, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण जागतिक महिला दिन साजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षा हिराबाई दिवेकर (माजी नगरसेविका उमरखेड) हे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमार केंद्रेकर (उपाध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर नविन पुतळा समिती, उमरखेड) हे होते. यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मौल्यवान माहिती व्यक्त केली.

या कार्यक्रमात जिजाबाई दिवेकर,सुभद्राबाई पाईकराव,यशोदाबाई दिवेकर, जाणकाबाई इंगोल, यशोदाबाई पाईकराव,भारताबाई दिवेकर, अनुसया दिवेकर, कु. शुभांगी इंगोले, कु.संघवी दिवेकर यांच्या सत्कार व स्वागत शांतिदुत समितीचे अध्यक्ष कुमार केंद्रेकर, सिध्दार्थ दिवेकर, मनोज इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वरील सर्व महिला मंडळ व रमामाता महिला मंडळ, शांतिदुत समिती, भीम टायगर सेना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिध्दार्थ दिवेकर (शहर अध्यक्ष भीम टायगर सेना,उमरखेड) यांनी केले तर आभार मनोज इंगोले यांनी मानले.