प्राथमिक आरोग्य केंद्र, नवेगाव पांडव व वाढोणा येथे कोविड 19 लसीकरणाला सुरुवात

29

🔹जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

नागभीड(दि.10मार्च):- अधिकाधिक नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी चंद्रपुर जिल्हा प्रशासन व जि.प.आरोग्य विभागाने आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरणाची सोय उपलब्ध करुन दिली आहे . आज नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव व वाढोणा या दोन्ही आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्राचे उद्घाटन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते व तालुका आरोग्य अधिकारी डॅा.विनोद मडावी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी नवेगाव पांडव येथे सरपंच सौ. शर्मिला रामटेके तर वाढोणा येथे पं.स.सदस्य शामकांत पुरकाम व सरपंच देवेन्द्र गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राथमिक आरोग्य केंद्र, नवेगाव पांडव व वाढोणा येथे लसीकरणाला आजपासुन सुरुवात करण्यात आली . यात मिंडाळा, कोर्धा , वाढोणा , सावरगाव केंद्रातील जि.प. प्राथमिक शिक्षकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली. नवेगाव हुंडेश्वरी येथील सहा.शिक्षक संजय येरणे यांना सर्वप्रथम कोविद लस आरोग्य सेविका सौ. व्ही. पी. मेश्राम ताई यांचे हस्ते देण्यात आली. लसीकरण अभियानात ९० हून अधिक शिक्षकांनी यात नोंदणी करुन लसीकरण करुन घेतले. सदर अभियान नवेगाव पांडव येथे डॉ. प्रियंका मडावी तर वाढोणा येथे डॅा.राहुल डोर्लीकर यांच्या मार्गदर्शनात सुरु राहणार आहे.याप्रसंगी आरोग्य सेवक चन्ने सर व मुकेश गंगमवार, मुकेश गेडाम, सौ. अर्चनाताई निखार,आरोग्यसेविका, आर. बी. सौंदरकर, डॉ. पी. बी. पांडव c.h.o. सचिन गजपुरे सह इतर आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी जय्यत तयारीसह कार्यक्रमा ला सहकार्य केले.

उद्घाटन प्रसंगी संजूभाऊ गजपुरे यांनी covid-19 ही आंतरराष्ट्रीय आरोग्य समस्या या विषयी आपली जबाबदारी ओळखून या समस्येवर प्रतिकात्मक उपाय करीत, नियमाचे पालन करीत, अफवा पासून सजग राहण्याचे आव्हान व मार्गदर्शन केले. अगदी आनंदमय वातावरणात लसीकरण पूर्ण करण्यात आले.