चिमूर तालुक्यातील वाघेडा येथे वाघाने मारली गाय

25
✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)मो:-7038121829

नेरी(दि.10मार्च):-नेरीवरून जवळ असलेल्या वाघेडा येथे ९ मार्चच्या मध्यरात्री गावाजवळील गोठ्यामध्ये बांधुन असलेल्या वाघाने गायीवर हल्ला करून ठार केले .ही घटना १० मार्चला सकाळी उघडकीस आली .ही गाय हेमंत चौधरी रा.वाघेडा यांच्या मालकीची आहे.

पहाटेला गाय मालक गोठ्याकडे गेले असता ही घटना घडल्याचे उघडकीस आले . याची माहीती वनवीभागाला देण्यात आली . वनवीभागाने ठार केलेल्या गायीचा पंचनामा केला. अंदाचे गायीची कींमत २०,००० असावी असे समजते.वाघावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले . या परीसरात वाघाने जनावरे ठार केलेल्या घटना घडत आहे .त्यामुळे वाघेडा येथील नागरीक भयभीत झाले आहेत