आगर टाकळी गावाजवळून होणारी अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करा- रिपब्लिकन पक्षाची मागणी

    32

    ✒️शातांराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

    नाशिक(दि.10मार्च):-आज दिनांक 10/3/2019 बुधवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने माननीय पोलीस उपायुक्त श्री विजयजी खरात साहेब यांची भेट घेऊन वरील मागणी करून निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे..
    मिरची हॉटेल ते पुढे आगर टाकळी गावाजवळून गेल्या चार ते पाच वर्षांपासून मोठी अवजड वाहने त्यात कंटेनर ट्रक यासारख्या मोठ्या वाहनांची चोवीस तास ये-जा चालू असते, परंतु गेली काही दिवसापासून प्रशासनाने संपूर्ण अवजड वाहतूक याच मार्गाने वळवील्यामुळे..आत्तापर्यंत बरेच लहान-मोठे अपघात झाले यात अनेक लोक जिवाला मुकले आहे..त्यातच गेल्या आठवड्यात जनता विद्यालयाच्या समोरील मोबाईल विक्रेते श्री.वर्मा यांचा अवजड वाहनाने चिरडून दुर्दैवी अंत झाला..

    आगर टाकळी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते विजय ममता चौक फेम टॉकीज पर्यंत दोन्ही बाजूने दाटीवाटीने लोकवस्ती वसलेली आहे, त्यामुळे भविष्यात फार मोठी वित्त व जीवित हानी होण्याची शक्यता या अवजड वाहनांमुळे निर्माण झाली आहे..म्हणूनच

    शिष्टमंडळाने माननीय उपायुक्त साहेब यांच्याकडे पुढील निर्णय होईपर्यंत वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावण्याचा आग्रह केला तो सरांनी लागलीच मान्य करून माननीय साहेबांनी तातडीने वाहतूक शाखेची संपर्क साधून निवेदनाची दखल घेतली..

    या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटोळे ,जिल्हा सचिव सागर अण्णा शिरसाठ ,युवा नेते विक्रांत गांगुर्डे, शुभम पाटोळे ,प्रशांत गांगुर्डे, किरण दोंदे ,ओमन शहा, चंदन सिंग, अमर जाधव ,आदी पदाधिकारी उपस्थित होते