मंञी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला मतदारसंघात ४७ कोटी १३ लक्ष रुपयांचे रस्ते आणि पुलांचे कामे मंजूर

    35

    ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

    नाशिक(दि.१०मार्च):-नाशिक-:महाराष्ट्र राज्याचा सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून नाशिक जिल्ह्यात ३५८ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे मंजूर झाली असून त्यात येवला मतदारसंघातील १५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तसेच नाबार्ड अंतर्गत एकूण चार पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे.येवला मतदारसंघातील या रस्त्यांसाठी व पुलांसाठी अर्थसंकल्पातून एकूण ४७ कोटी १३ लक्ष रुपये निधीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

    सन २०२१ – २२ च्या अर्थसंकल्पातून येवला मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्ग व इतर मार्गातील राज्य महामार्ग १० प्ररामा ८ ते नांदुरसुकी रस्ता ते राज्य मार्ग २५ रस्ता ते रेल्वे स्टेशन ते राज्य मार्ग १० रस्ता प्र जिल्हा मार्ग ७९ किमी १/०० ते ४/१०० या रस्त्याचे चे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ६३ लक्ष रुपये, मातुलठाण धामणगांव अंदरसुल ते प्रजिमा ८० रस्ता प्रजिमा १६१ किमी ०/०० ते ४/०० मध्ये रुंदीकरण मबजुतीकरण डांबरीकरण करण्यासाठी ३ कोटी ६० लक्ष, राजापुर ममदापुर खरवंडी भारम रस्ता प्रजिमा ७६ किमी २७/२०० ते ३०/२०० रस्ता रुंदीकरणासह मजबूतरीकरण करण्यासाठी १ कोटी ९५ लक्ष, उंदीरवाडी कोटमगांव नगरसुल कोळगांव ममदापूर प्रजिमा ७६ रस्ता प्रजिमा १६० किमी १५/३०० ते २०/३०० रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष, मातुलठाण धामणगांव अंदरसुल ते प्रजिमा ८० रस्ता प्रजिमा १६१ किमी ९ / ०० ते १५/०० मध्ये रुंदीकरण मबजुतीकरण डांबरीकरण करण्यासाठी ५ कोटी, नागडे-धामणगांव-भारम-वाघाळे ते औरंगाबाद हद्द रस्ता प्रजिमा ७८ किमी १३/०० ते १६/०० या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी १० लक्षच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

    त्याचबरोबर लासलगांव-विचुर रस्ता राज्य मार्ग ०७ सा.क्र १९८/२०० ते १९९/०० मध्ये रस्त्यामध्ये येणाऱ्या काँक्रीट गटारीचे बांधकाम करण्यासाठी ५५ लक्ष,प्रजिमा ६९ ते म-हळगोई विचुर सुभाषनगर सोनवाडी खु. कोळवाडी ते निफाड प्ररामा ४४ ला मिळणारा रस्ता प्रजिमा १२४ किमी ०/०० ते २/०० व ७/५०० ते १२/०० ची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी १० लक्ष, वाहेगांव नांदगांव धारणगांव रस्ता प्रजिमा १२७ किमी ८/५०० ते १७/५०० ची सुधारणा करण्यासाठी ५ कोटी,राज्यमार्ग २७ ते नांदुर मध्यमेश्वर सारोळेथडी खेडलेझुंगे कोळगांव कानळद शिरवाडे वाकद मुखेड प्रमुख जिल्हा मार्ग ७५ ला मिळणारा रस्ता प्रजिमा १०५ किमी ९ / ०० ते १८/५०० ची सुधारणा करण्यासाठी ४ कोटी, अनकाई कुसमाडी नगरसुल ते पिंपळगांव जलाल प्रजिमा ६५ किमी ६४/०० ते ६८/२०० ची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी, अनकाई कुसमाडी नगरसुल ते पिंपळगांव जलाल प्रजिमा ६५ किमी ५ ९ / ०० ते ६४/०० ची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी,पाटोदा सावरगांव नगरसुल वाईबोथी भारम रस्ता प्रजिमा ६८ किमी ४३/५०० ते ४५/४०० ची सुधारणा करण्यासाठी १ कोटी ४५ लक्ष, गोपाळवाडी प्ररामा ८ अनकुटे धामोडे रामा २५ ते मातुलठाण सायगांव अंगुलगांव प्रजिमा ७८ प्रजिमा १५९ रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी,पाटोदा सावरगांव नगरसुल वाईबोथी भारम रस्ता प्रजिमा ६८ किमी ०४ / ०० ते २५/३०० , ( ४/०० ते ४/७०० , १५/०० ते १५/३०० , १८४८०० ते २४/०० ) या लांबीतील डांबरीकरण मजबुतीकरण करण्यासाठी २ कोटी ८० लक्ष अशा एकूण १५ रस्त्यासाठी ४३ कोटी ६८ लक्ष या कामांना मंजुरी मिळाली आहे.

    त्याचबरोबर नाबार्ड अंतर्गत देशमाने मानोरी मुखेड निमगांवमढ नातेगांव ते प्ररामा ८ रस्ता प्रजिमा ७५ रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम व सुधारणा करण्यासाठी ७७.७२ लक्ष, साबरवाडी ते तांदुळवाडी रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी ७० लक्ष, सोमठाण देश ते शेळकेवाडी रस्ता ग्रामा १२४ सा.क्र .३ / ०० वर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ६ लक्ष, तर नेऊरगांव ते मुखेड रस्ता इजिमा १९४ सा.क्र. ३/०० वर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी ९०.६७ लक्ष असे एकूण ३ कोटी ४५ लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी अधिक फायदा होणार आहे.