कानडीमाळी येथे महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

25

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.10मार्च):- दि १० रोजी केज तालुक्यातील कानडीमाळी येथे समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. सदरील माहिती अशी की केज तालुक्यातील कानडीमाळी येथे जागतिक महिला दिनानिमित्त समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले लॉकडाऊनच्या काळात महिला व मुलावर झालेल्या अन्याय/अत्याचार /हिंसा मोठ्या प्रमाणात झाल्या ग्रामपंचायत म्हणून कोरो द्वारे चर्चेत आल्या.

त्या वेळी सरपंच अमर आबा राऊत यांनी गावातील महिला व कोरो संघटनेच्या महिला यांच्या मदतीने महिला समुपदेशन केंद्र करण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत मांडला व त्याचे आज ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कोरो संघटनेच्या अनिता खंडागळे, लक्ष्मण हजारे, रोहिणी खरात, अविनाश खरात, तसेच सरपंच अमर आबा राऊत, गणेश गरूड,रेखा राऊत,शोभा राऊत,वच्छला राऊत, आणि गावातील सर्व नागरिक व इतर सदस्य उपस्थित होते..