पोषक आहार काळ्याबाजारात विकून पुरावा नष्ट करण्याऱ्याची चौकशी करा – विक्रम पाटील बामणीकर

28

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.11मार्च):- नायगाव तालुक्यात गर्भवती माता आणि बालकांना बाल विकास प्रकल्प योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका मार्फत वाटप केल्या जाणाऱ्या पोषक आहाराच्या पिशव्या बेटक बिलोली येथील नाल्यात सापडल्याने काळ्याबाजारात विकणाऱ्या पोषक आहाराची तात्काळ चौकशी करून नायगाव तालुक्यातील गर्भवती माता आणि अंगणवाडी बालकांच्या पोषक आहारावर डल्ला मारून आपली पोळी भाजून घेणाऱ्या व यांना पाठबळ देणाऱ्या बाल विकास प्रकल्प अधिकारी राजुरे यांची देखील तात्काळ चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवराज्य किंवा संघटनेचे नांदेड जिल्हा प्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकारी नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील व शहरी भागातील व वाडी तांड्यावरील गर्भवती माता व अंगणवाडी बालकांच्या पोषक आहार देण्यासाठी करोडो रुपये खर्च राज्य सरकार करत आहे पण तालुकास्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे पोषक आहार ग्रामीण भागातील व वाडीतड्या वरील गर्भवती माता आणि अंगणवाडी बालकांपर्यंत पोहोचत नाही.

याचे ताजे उदाहरण नायगाव तालुक्यातील बेटक बिलोली लगत असलेल्या नाल्यांमध्ये गर्भवती माता व अंगणवाडी बालकांच्या पोषक आहार दिल्या जाणाऱ्या खुल्या पिशव्या या ठिकाणी आढळून आले आहेत नायगाव तालुक्यातील गरोदर माता व बालकांना वाटप करण्यात येणार्‍या पोषक आहाराला पाय फुटत आहेत या आहाराची काळ्याबाजारात विक्री होत आहे. या पोषक आहारामध्ये गहू चना मसूर डाळ चटणी यांचे वाटप केले जाते पण नायगाव तालुक्यातील बेटक बिलोली येथे नदीपात्रामध्ये सापडलेल्या पोषण आहाराचा रिकाम्या पिशव्या या अलीकडच्या महिन्यातील आहेत त्यातील धान्य काढून घेऊन पुरावा नष्ट करण्यासाठी शासनाचे शिक्के असलेल्या शेकडो पिशव्या पोत्यात भरून बेटक बिलोली मुस्तापूर दरम्यान वाहणाऱ्या एका मोठ्या नाल्यात पुरावा नष्ट करण्यासाठी टाकून देण्यात आलेल्या आहेत.

परंतु सदर पिशव्या वाहून गेल्या नसल्याने सदरील प्रकार हा उघडकीस आल्याने गरोदर माता व बालकांच्या तोंडाच्या घासावर दरोडा टाकण्याचे पाप करणाऱ्या कर्मचारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची आठ दिवसात कसून चौकशी करण्यात यावी अन्यथा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख नांदेड प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाप्रमुख नायगाव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत