वचित बहुजन आघाडी महागाव च्या वतीने सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा

22

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.11मार्च):- आजच्या महिला डॉक्टर झाल्या ,वकिल झाल्या ,पोलीस झाल्या ,पायलट झाल्या विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या एवढेच नव्हे .तर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या हे केवळ आणि केवळ आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यामुळेच म्हणून विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत.असे प्रतिपादन पप्पु कावळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाच्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी महागाव यांच्या वतीने पक्ष कार्यालय येथे साजरा करण्यात आला .यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .

यावेळी विजय लहाने, वंदना भवरे ,विजयकुमार कांबळे, चांदू मोरे ,काशिनाथ शिंदे, प्रसाद शिंदे, राजानन कांबळे , तातेराव मानकर ,सुरेश खंदारे ,सतीश खाडे ,रामराव कांबळे ,रामराव कांबळे ,श्रीराम राजनकर, संजय खंदारे ,पंजाबराव सरदार, बळवंत पंडागळे, प्रल्हाद नवसागरे, प्रदीप अढागळे इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.