समाजातील विकृत पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी महिलांनि पुढाकार घ्यावा -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

30

✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.12मार्च):- भारतीय संविधानाद्वारे स्त्रीच्या आत्मसन्मानासाठी व सुरक्षितता साठी अनेक कायद्याची तरतूद आहे महिलांनी सावित्रीबाई फुले च्या क्रांती मुळे शिक्षणात आपली क्षमता व सामर्थ्य व प्रगती करून दाखवून दिले आहे तरी महिला वर्तमान परिस्थिती त अबला का? अजूनही निर्णय प्रक्रियेत तिच्या मताचा विचार समाजात किंवा कुटुंबात का केला जात नाही ? स्त्री भ्रूण हत्या ,हुंडा बळी, बलात्कार असे महिला वरील अत्याचार अजुनही थांबले का नाही? विकृत मानसिकता अजूनही समाजांमध्ये जिवंत कशी काय आहे?,तेव्हा महिलांनीच यावर विचार करून आत्मविश्वासा नि समोर येऊन असल्या विकृत पुरुषी मानसिकता बद्दलवण्यासाठी पुढाकार घ्यावा अश्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले समूर्तीदिनानिमित्त डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व महिला बालकल्याण मालेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मालेवाडा ग्रामपंचायत सदस्य वर्षा दोडके ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे अंगणवाडी सेविका ललिता वरखेडे रसिका चौधरी ,सुमित्रा दडमल, शशिकला कुमरे, आदी उपस्थित होत्या.पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हनाल्या की आजही विकृत पुरुसत्ताक वर्चस्व गाजविणाऱ्या लोकांची मानसिकता समाजा मंध्ये जिवंत जशी आहे तशी च दिसते सक्तीची गर्भधारणा, गर्भपात, स्त्री भ्रूण हत्या कुटुंबातील मानसिक त्रास बाहेरील शोषण अशे अन्याय रोज समाजात महिला वर होताना दिसतात महिला नि असल्या विकृत मानसिकतेला प्रखर विरोध करण्यास शिकले पाहिजे महिला बोलकी झाली पाहिजे महिला ही महिला ची विरोधक असता कामा नये तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे ती एक माणूस आहे ती भोग वस्तू नसुन ती माता आहे भारत देशातील खरी संस्कृती तिच्या मुळे टिकून आहे.

महिला खऱ्या अर्थाने देशाची सेवा करतात कर्तृत्वान मुले ही तिच्यापासुन च निर्माण होतात हे समाजांनी ओळखले पाहिजे व तिचा सन्मान करणे ही सामाजिक जबाबदारी समजली पाहिजे व महिलांनि सुद्धा स्वतःच्या समस्या सोडविण्यासाठी समर्थ असणे गरजेचे आहे ती बुद्धी वाण आहे तिला तिच्या सुप्तगुणाची सृजनशील कर्तृत्वाची लवकर जाण होणे फार महत्त्वाचे आहे तेंव्हा च सदृढ समाजाची उभारणी होईल अश्या यावेळी समतादूत प्रज्ञा राजूरवाडे ह्या बोलत होत्या यावेळी हुंडा प्रतिबंधक कायदा व कौटुंबिक हिंसाचारा पासुन महिलांचे संरक्षण 2005 याची माहिती दिली तसेच बार्टी तर्फे पोलीस प्रशिक्षना बद्दल सुद्धा माहिती यावेळी देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करिष्मा शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंजुळा ननावरे यांनी मानले