केम येथे सेवानिवृत्त पोस्टमण यांचा सत्कार

28

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.12मार्च):-करमाळा तालुक्यातील वडशिवणे गावचे पोस्टमण श्री मारुती सिताराम शेलार यांचा सत्कार साडे गावचे युवा नेते सुनिल शेलार यांच्या हस्ते करण्यात आला
सेवानिवृत्त पोस्टमण मारुती शेलार यांनी वडशिवणे केम उपळवटे या गावांमध्ये प्रमाणीक पणे नोकरी केली त्यांनी ४३ वर्षी प्रमाणीकपणे लोकांची सेवा केली पत्रांची देवाण घेवाण करण्याचं काम त्यांनी काळजी पुर्वक केलं पंधरा पैसे च्या पत्रामधील दोन ओळीतलं जे प्रेम होतं ते आता राहिले नाही.

जुन्या लोकांचे प्रेम खरंच वेगळं होतं लोकांची पत्र पोच करताना त्यांना ते वाचुन दाखविण्याचा आनंद वेगळाच होता पहिली माया वेगळीचं होती आता मानुसकी राहिली नाही भावभावाला ओळखत नाही याची खंत पोस्टमण मारुती शेलार यांनी सत्कार समारंभाच्या वेळी व्यक्त केली मोबाईल च्या जमान्यात पत्रांचा व्यवाहार जरी बंद झाला असला तरी मानुसकी बंद पाडु नका एक जिवांनी रहावा असा चांगला संदेश पोस्टमण मारुती शेलार यांनी दिला आहे.

यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी करमाळा नागेश डुकरे ( s d I ) पांडुरंग कोकीळ राजाराम रोंगे राजेंद्र दोंड दिपक लोंढे महादेव जगदाळे बाळु गोसावी नानासाहेब मोरे (s p m केम) सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे उपळवटे अदी मान्यवर उपस्थित होते