वैद्यनाथ देवस्थानच्या सीसीटीव्ही फुटेज चौकशी करण्याचे आदेश देऊनही कारवाई का नाही?

38

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.13मार्च):-महाराष्ट्र शासनाकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी वैद्यनाथ देवस्थानच्या मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज चौकशी करण्याची मागणी केली होती. शासनाकडून विधी व न्याय विभागामार्फत धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्याकडून सह धर्मादाय आयुक्त बीड यांना दि 23/ 12/ 2020 ला आदेश चौकशीचे देण्यात आले असून आजतागायत का चौकशी केली नाही यासंदर्भात काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी परत चौकशी करून वैजनाथ देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

दि 23 मार्च 2020 ते 7सप्टेंबर 2020 च्या दरम्यान वैद्यनाथ मंदिरात ठराविक व्हीआयपी लोकांना दर्शन घेण्यासाठी पूजा व अभिषेक करण्यासाठी “खास बाब” म्हणून परवानगी देण्यात आली होती, तसे सी सी टीव्ही फुटेजमध्ये सर्व निदर्शनास चौकशीअंती बाहेर येईल. लॉक डाऊन च्या काळात सर्व नियमाचे केंद्र व राज्य सरकार कडून मंदिर, मज्जित, दर्गा व गुरुद्वारा बंद ठेवण्याचे आदेश असतानाही परळीच्या वैद्यनाथ मंदिरात ट्रस्टी च्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मंदिराचा गैरवापर करून व्हीआयपी ना दर्शन देण्यात आले आहे.

असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे पुन्हा केलेला आहे. लॉक डाऊन मध्ये शिवभक्त वैधनाथ पिंडीचे दर्शन घेण्यासाठी येत नव्हते तर पायरीचे व कळसाचे दर्शन घेण्यासाठी येत होते तरीही शिवभक्तांना ट्रस्टच्या मार्फत सुरक्षा रक्षक कडून शिवीगाळ व मारहाण करण्यात आलेली आहे याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केलेली आहे. वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी स्वतःच्या बापाची जहागिरी वैद्यनाथ मंदिरा बाबत समजतात त्यामुळे लॉक डाऊन मधील सर्व फुटेज तपासून वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी चे आदेश देऊनही का कारवाई केली जात नाही असा सवाल उपस्थित काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला आहे.