आईचा देह वैद्यकीय महाविद्यालयास दान

26

🔹परिवर्तनवादी विचारला सलाम

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.13मार्च):- येथीलसामाजिक कार्यकर्त्या सूर्यमाला मोतीपवळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मृत्यूनंतर आईचा देहदान करण्याचा संकल्प केला. त्यांचे पहिले पाऊल टाकत त्यांची आई कै. सुंदरबाई विश्वनाथ हसनाळे यांची देह (शरीर) नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास दान केली. एवढेच नव्हे तर मृत्यूनंतरच्या सर्व विधींना फाटा देत. त्यांनी पुस्तके भेट देण्याचा निर्णय घेतला.जागतिक महिला दिन तसेच सावित्रीबाई फुलेस्मृतिदिनानिमित्त त्यांनी पुस्तकेही भेट दिली.

याप्रसंगी डॉ.सुनिल जाधव, सौ. जाधव, श्रीमती लक्ष्मी खरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रामेश्वर बचाटे, गंगाखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष पिराजी कांबळे, शिवराज मोतीपवळे व इतर मान्यवर उपस्थित होते.त्यांचे हे कार्य समाजाला नक्कीच दिशादर्शक व प्रेरणादायी ठरणारे आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत असून परिवर्तनवादी विचार व कार्याला लोक सलाम करत आहेत.