राज्यपालांनी शेवराई सेवाभावी संस्थेची घेतली दखल

24

✒️सुनिल  ज्ञानदेव भोसले(पुणे प्रतिनिधी)मो:-9146241956

पुणे(दि.15मार्च):- चारशे वर्षांनी आदिवासी पारधी समाजाचे प्रश्न पहिल्यांदाच राजभवनात राज्यपालांपर्यंत पोचले, या वेळी शेवराई सेवाभावी संस्थेच्या कामाची दखल घेत, या संस्थेच्या माध्यमातून आदिवासीसाठी अनेक चांगले कामं केली.

कोरोनाच्या काळात गरीब कुटुंबातील लोकांना उत्कृष्ट मदत करत गावात खेडोपाड्यात जाऊन लोकांची भुक भागवण्याचे काम या संस्थेने केले आहेअशा शब्दांत महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांनी संस्थेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष. आदिवासी समाजसेवक साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले,
आदिवासी समाजसेवक,साहित्यिक नामदेव भोसले यांनी आदिवासी पारधी समाजाच्या 16 मुद्द्यावर राज्यपाला समोर मांडल्या.

या वेळी पारधी समाजावरील “मराशी”नावाचा माहितीपट आणि भारतातून पहिल्यांदाच आदिवासी पारधी भाषा लिखित पुस्तक “मराशी” व आत्मकथा “ये हाल, पुस्तक व 10 पाणी 16 मुद्याचे पारधी समाजातील अडचणी विषयी निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम मा.भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले.

विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हातील शासकीय महसूल अधिकारी व गृह विभागातील पोलीस अधिकारी हे आज देखिल आदिवासींना न्याय न देता त्यांच्यावर चोर दरोडेखोर नावाचा कलंकीत दरीत ढकलतात.

अजुनही अनेक ठिकाणी हे अधिकारी पारधी म्हटले जातीय भेद भाव मानत टाकाऊ नजरेने पहातात. शासकीय सवलती आदिवासी पर्यंत पोहचू दिल्या जात नाही.

हि दुःखत बाब आहे,हे कुठेतरी थांबावे व अशा अधिका-याला निलंबनाची कारवाई करून कडक शासन व्हावे
अशी मागणी नामदेव भोसले यांनी केली.

भारत पारतंत्र्यात दैना,स्वातंत्र्यानंतर देखिल हाल,आदिवासी पारधी समाज हा मुळ जंगलप्रेमी आहे, तो आज देखील निसर्गाची पुजा करत आहे.

परंतू पारधी हा निसर्गाच्या निगडीत आसल्या मुळे व गावकुसाबाहेर राहिल्यामुळे व गावपुढा-याच्या स्वार्थी राजकारणा मुळे तो शिक्षणापासून ,
ज्ञानापासून ,शासकीय सोयी सुविधेपासुन वंचित राहीला.

आजपर्यंत आदिवासी पारधी समाजाला न्याय मिळाला नाही,हि दुःखत बाब आहे.त्यामुळे शोषित,गरीब, वंचित ,पिढीत आदिवासी पारधी लोकांना न्याय मिळावा व
समाजाच्या उत्कर्षासाठी विविध मागण्यांचे
निवेदन राज्यपाल यांच्याकडे भोसले यांनी निवेदन सादर केले.

या मागण्यांविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन माननीय महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आश्वासन दिले.

मा. राज्यपाल यांच्याकडे समाजहिताची मागणी केली.
विशेष महत्त्वपूर्ण म्हणजे सर्व पारधी कुटुंबांना अंतोदय योजनेचा लाभ देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, जातीचे दाखले सर्वांना देण्यात यावे .

1950चे पुरावे नसतील तर स्थानिक चौकशी बोलीभाषा बघुन त्यांना दाखले देण्यात यावेत, त्यातील जाचक अटी कमी कराव्यात.

प्रत्येक जिल्हात स्पर्धा केंद्र सुरू करावेत, प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार यांना आदिवासी पारधी समाजाचा पालक अधिकार म्हणून घोषित करून त्यांची मार्गदर्शक तत्वे दिशादर्शक निर्देश जारी करावेत.

आवास योजनेंतर्गत पारधी समाजातील लोकांना एकंदरीत कसलीही अटी न मागता जागा व घरकुल बांधून द्यावेत व त्यांची अंमलबजावणी करुन प्रत्येक जिल्हातील जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात यावेत.

महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार पुरस्कृत असलेल्या प्रत्येक आदिवासी समाजसेवकांना प्रती महिना 5 हजार रुपये मानधन रुपी मिळावेत व विशेष शासकीय सवलती मिळाव्यात.प्रत्येक जिल्हाधिकारी व पोलीस आधिक्षक कार्यात सन्मानाची वागणूक मिळावी,असे प्रत्येक जिल्हाला निर्देश घ्यावेत.

असे 16 विविध मागण्यांचे निवेदन नामदेव भोसले यांनी दिले,सदर या समाजसेवेसाठी दौंडचे लोकप्रिय आमदार राहुलदादा कुल,आय.ए.एस.मा.मुळगेकर साहेब गुरुवर्य, व्ही. व्ही.लक्ष्मीनारायण साहेब,आय.ए.एस. मा. हिरालाल सोनवणे, अप्पर जिल्हाधिकारी मा. उमाकांत पारधी साहेब,पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, पोलीस उपमहानिरीक्षक मा. संदिप पाटील, अॅड.आनिल तांबे साहेब,पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,जेष्ठ साहित्यिक भास्कर भोसले,यांनी मोलाचे सहकार्य केले.

या वेळी महामहिम राज्यपाल साहेबांना निवेदन देताना शेवराई सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, आदिवासी समाजसेवक,साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले, राजेद्र भगवान कांचन,जेष्ठ साहित्यिक भास्कर भोसले ,सचिन टिळेकर, स्वप्रित भोसले हे उपस्थित होत.