भीमा-सीना जोड कालवा(बोगदा) शाप्ट १ व २ वरील वीज महावितरण कडून वीज पुरवठा खंडित

28

🔸बोगद्यात उडी मारून जीव देण्याशिवाय पर्यायच नाही

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.15मार्च):-माढा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या भीमा – सीना जोड कालव्यावरील शाप्ट क्रमांक २ व ३ येथील वीज पुरवठा मागील दोन ते तीन दिवसांपासून शेतकरी जो पर्यंत वीज बिल भरत नाहीत तो पर्यंत खंडित केलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा हा सर्वात जास्त साखर कारखाने असणारा तालुका आहे. ऊसाचे क्षेत्र ही याच तालुक्यात सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रतच नव्हे तर जगात साखरेचा जिल्हा म्हणून सोलापूरला ओळख याच भीमा-सीना कालव्या काठच्या शेतकर्यांनी मिळवुन दिली, पण आज त्याच शेतकर्यांच्या कृषी पंपांची वीज खंडित केली जाते. यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?

*महावितरणचा भोंगळ कारभार रिडींग न घेताच दिली जातात कृषी पंपांची बीले*

शेतकरी म्हणत आहेत की आज पर्यंत कधीही कोणीही मीटरची रिडींग घेतलेली नाही, तर तुम्ही बील कोणत्या आधारावर पाठवता. कुठलाही महावितरणचा अधिकारी मीटरचे रिडींग घेण्यासाठी येत नाही. तर काही पंपांना तर मीटरचे बसवलेले नाहीत.मग बील कसे भरायचे. याचाही विचार मांडले. मा.ऊर्जा मंत्र्यांनी करावा. भीमा-सीना कालव्याला वर्षेातून तीन ते चार वेळा पाणी सुटते वीज मात्र पूर्ण वर्षेाचे येते. म्हणजे पंप बंद असतात पण वीजबील चालूच असते.

*बोगद्यात उडी टाकून आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच नाही*

ज्या बोगद्याने आजपर्यंत आमचे प्रपंच चालवले शेतीला पाणी दिले, आज त्याच बोगद्यात उडी मारून जीवा द्यावा असे वाटत आहे असे शेतकरी बोलत आहेत. कारण हातात तोंडाशी आलेली पीके डोळ्यासमोर जळत असतील, तर याच बोगद्यात उडी मारून जीवा वाटत आहे.

*सरकार आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे का?*

शेतकर्यांला कोणी बळीराजा म्हणत तर कोणी शेतकर्यांच्या मतावर सरकार स्थापन करत पण मदत कोणी सुद्धा करत नाही. सरकार आणि विरोधी पक्षनेते दोन्ही आम्हां शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. निवडणूकांच्या वेळी हातात पाया पडणारे पुढारी आज गायब झाले आहेत.