नगरसेवक विनू पापीनवार आता ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची सोशल मीडियावर चर्चा

56

✒️विषेश प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)मो:-9960748682

नायगाव(दि.15मार्च):-लोहा /कंधार/ नांदेड २०१९ ची लोहा – कंधार विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चर्चेत असलेले व ऐनवेळी वंचीत बहुजन आघाडीने उमेदवारी दिली नसल्यामुळे विधानसभेची निवडणूक लढविण्यापासून वंचित असलेले गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमीच मदत करणारे दलीत बहुजन समाजासोबत मैत्रिपूर्ण संबंध राखून त्यांना वेळोवेळी सहकार्य करणारी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुद्धा सदा अग्रेसर राहणारे युवकांचे हृदयसम्राट लोहा व कंधार तालुक्याची आन-बान शान असलेले कंधार नगरपालिकेचे विद्यमान कर्तव्यदक्ष लोकप्रिय नगरसेवक विनू सावकार पापीनवार हे आता कंधार शहरातील जनतेच्या सेवेनंतर ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या आग्रहास्तव जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सोशल मीडियातून जोरदारपणे होत आहे.

कंधार नगरपालिकेचे निवडणुक ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे जिंकणारे व नगरसेवक म्हणून उत्कृष्ट कार्य करणारे विनू सावकार पापीनवार यांनी नगरपालिका ,जिल्हा परिषद व नंतर विधानसभा अशी टप्प्याटप्प्याने निवडणूक लढवावी व विजयी व्हावे व जनतेची सेवा त्याच्या हातून चांगली घडावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून होत आहे.कंधार च्या पापीनवार घराण्यात जन्मास आलेले व अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेले नगरसेवक विनू सावकार पापीनवार हे त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक भागवत पापीनवार व वडील वसंत सावकार पापीनवार यांच्या प्रमाणे समाजाची देशाची सेवा करणारे देशभक्त असणारे लोकांच्या सुखा दुःखात धावून जाणारे गोरगरीबांना नियमित मदत करणारे नगरसेवक विनू सावकार पापीनवार यांच्याबद्दल जनतेत मोठी सहानुभूती आहे आदर आहे त्यांच्या घराण्याला समाजसेवेचा वारसा आहे.

तो वारसा आता पापीनवार घराण्याची तिसरी पिढी म्हणून विनू सावकार पापीनवार असुन त्यांनी आता जिल्ह्याचे मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदे मध्ये पदार्पण करावे गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांना विविध योजना मिळवून देण्यासाठी विनू सावकार पापीनवार यांनी लोहा कंधार मतदार संघातून जिल्हा परिषद साठी कलंबर, बहादपुरा,फुलवळ, माळोकोळी, सावरगाव,कुरूळा या कोणत्याही सर्कलमधून आरक्षण सर्वसाधारण (ओपनला ) सुटल्यास उभे राहावे जनता त्यांच्या पाठीशी आहे पक्ष कोणताही असो किंवा ते अपक्ष असो जिल्हा परिषदे नंतर विधानसभेची ही तयारी त्यांनी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे…