घाटपुरी कोव्हिड सेंन्टर येथे स्वच्छतेचा अभाव

25

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.15मार्च):- वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी शासन बेंबीच्या देठापासुन ओरडुन ओरडुन सांगत असतांना काळजीचे आव्हाहन करत आहे.मास्क,सॅनिटायझर,स्वच्छता आदींची जनजाग्रुती चालु असतांना बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाचे व्यापारी केंद्र औद्योगिक केंद्र असलेल्या खामगाव तालुक्यातील शहरापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या समाज कल्याण विभागाच्या वस्तीग्रूहामध्ये सुरु करण्यात आलेल्या घाटपुरी येथील कोरोना आॅसोलेशन सेंन्टर येथे स्वच्छतेचा व औषधीचा बोजवारा ऊडाल्याचे चिञ या सेंन्टर वर असलेल्या रुग्णांनी कळविले आहे.

यासाठी जवाबदार असलेले संबधीत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. खिरोडकर यांना ९९२३०६०२०९ वर संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळले यापुर्वीही स्वच्छतेच्या नावाखाली वापण्यात आलेले मास्क,तेथिल कचरा हा राज्यमार्ग असलेल्या पिंपळगावराजा रस्त्यावर फेकुनदिलेला.असल्याचे,आढळुन आले आहे, आवश्यक असलेले मेडीसिन ऊपल्बध्द नसल्याने तेथिल रुग्ण फोन द्वारे याची माहीती देत आहेत वाढत असलेला कोरोना विषाणुचा आकडा चिंता करणारा असुन बुलढाणा जिल्हा यात आघाडीवर जात आहे.याकडे तत्काळ वरिष्ठांनी लक्ष देऊन या विषाणुशी लढणार्या रुग्णांची हेळसांड थांबवावी अशी मागणी त्यांचे परिवारातील सदस्य करित आहे.