वीज कपातीवरून अतुल खुपसे-पाटील करमाळ्यात कडाडले

    35

    ?खासदार रणजितसिंह निंबाळकर ही करमाळ्यात दाखल

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.15मार्च):-महावितरण कडून राज्यभर थकीत वीज बील वसूली मोहीम राबवली जात आहे. या अतंर्गत कृषी पंपांची वीज कपात केली जात आहे. त्या संदर्भात आज श्री अतुल खुपसे-पाटील यांनी करमाळा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले, यावेळी अतुल खुपसे-पाटील म्हणाले की तुम्हाला जर वसुलीच करायची असेल पावसाळ्यात करा अशा प्रकारे शेतकर्यांची अडवणूक करुन वसूली करू नका.
    *वसूली बंद करा अन्यथा आत्महत्ये शिवाय पर्याय नाही*
    महावितरण कडून जर वसूली मोहीम बंद करण्यात नाही आली तर शेतकर्यांसमोर आत्महत्ये शिवाय पर्यायच उरला नाही.

    पोटच्या मुलांसारखे वाढवलेले पीक डोळ्यासमोर जळताना कोणताही शेतकरी पाहू शकत नाही. त्यामुळे यावर महावितरणने गांभीर्याने विचार करावा.
    *एखाद्या शेतकर्यांने आत्महत्या केली तर त्यास महावितरण जबाबदार*मग अस म्हणावे लागेल की महावितरण शेतकर्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करत आहे. हातात तोंडाशी आलेल्या पीक डोळ्यासमोर जळत असताना, आम्हा शेतकर्यांचा जीव कासावीस होतो आहे. यातच एखाद्या शेतकर्यांने टोकाचे पाऊल उचलुन आत्महत्या केली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महावितरणची असेल असे श्री. अतुल खुपसे-पाटील म्हणाले.
    *माढ्याचे खासदार श्री. रणजितसिंह निंबाळकर करमाळ्यात दाखल.

    माढ्याचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह निंबाळकर हे ही अतुल खुपसे-पाटील यांना प्रोत्साहन देण्यासाठी करमाळा येथे आले होते. यावेळी खासदार म्हणाले की महावितरण व सरकारने शेतकर्यांचाही विचार करावा, लाॅकडाऊन नंतर शेतकरी कसातरी शेती करत आहे आणि त्यातच वीजबिल भरायचे म्हणल्यावर शेती नाही केलेली बरी.

    ?पोलीस आणि अतुल खुपसे-पाटील यांच्यात शाब्दिक चकमक
    आंदोलनावेळी शेकडोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते, यावरूनच अतुल खुपसे-पाटील व पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कोरोना चे कारण देवून आंदोलन दाबण्याचा कट रचला जात होता, पण अतुल खुपसे-पाटील यांनी तो उधळून लावला.निवेदन दिल्यानंतर करमाळ्याचे पी. आय. पाडुळे यांनी चार ते पाच आंदोलकांना बराच वेळ पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवले होते* नंतर त्या आंदोलकांना सोडून देण्यात आले.