वझर येथील सरपंचाचे नागरिकांना आवाहन.पंचेचाळीस ते साठ वयोगटातील नागरिकांनी कोरोणा लस घ्यावी

42

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.15मार्च):- देगलूर तालुक्यातील वझर येथील प्रथम नागरिक सौ.उज्वलाताई आनंदराव पळनीटकर पाटील ( सरपंच)व त्यांचे पती माजी समन्वय समिती अध्यक्ष श्री आनंदराव पळनीटकर पाटील यांनी आज हणेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन कोरोनाची लस घेतले.ही लस प्राथमिक आरोग्य केंद्र हणेगाव येथे देण्यात येत आहे.हि लस सोमवार,बुधूवार,शनिवार असे तीन दिवस देण्यात येत आहेत असे सौ.कलावती बालाजी पळनीटकर यांनी माहिती दिली.ही लस पंचेचाळीस ते साठ वयोगटातील नागरिकांना देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

यावेळी वझरच्या सरपंचानी वझर येथील नागरिकांना आवाहन करून सांगितले की मागील एक वर्षापासून चालू असलेल्या कोरोणा महामारीच्या भितीपोटी जनता हैराण झाली व काहीजन कोरोणाचे बळी पडले.त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर कोरोनाची लस घेऊन कोरोणा मुक्त व्हावे व कोरोणापासून बरे व्हावे असे सांगण्यात आले.यावेळी वझर येथील सरपंच सौ.उज्वलाताई आनंदराव पळनीटकर,मा.आनंदराव पळनीटकर,सौ.कलावती बालाजी पळनीटकर(सिस्टर),ज्ञानोबा बिरादार,हणमंत शिंदे आदी उपस्थित होते.