दिव्यांग कर्मचाऱ्याचा प्रशीस्त प्रमाणपत्र देऊन केला सन्मान

33

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.17मार्च):-निवडणूक विभागाने राबवलेल्या मोहिमेत ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक 2020 एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नव्याने स्थापित होणाऱ्या गंगाखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीत सार्वजनिक निवडणूक तसेच सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक करिता निवडणूक संगणीकृत कामकाज उत्कृष्टरित्या पार पाडून प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल शंकर साबळे यांना प्रशस्त प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी तहसिलदार स्वरूप कंकाळ, गट विकास अधिकारी अंकुश चव्हाण, नायब तहसीलदार, वरिष्ठ लिपिक शेख रियाज आनंद वाघमारे यांच्या हस्ते पण प्रमाणपत्र देऊन शंकर साबळे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते