भारतीय पत्रकार संघटनेच्या देगलूर तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत गज्जलवार यांची निवड

    84

    ✒️देगलूर प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

    देगलूर(दि.17मार्च):- भारतीय कम्युनिस्ट पार्टी(युनायटेड ) संलग्नित भारतीय पत्रकार संघटनेच्या देगलूर तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत गंगाराम गज्जलवार वळगकर यांची निवड करण्यात आली.

    त्यांच्या निवडीबद्दल भारतीय कम्युनिस्ट पार्टी(युनायटेड) चे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.प्रा.सदाशिव भुयारे,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड विखार शेख मरखेलकर,राज्य उपाध्यक्ष कॉ.प्रा.इरवंत सुर्यकर, राज्य प्रसिध्दीप्रमुख प्रा.डॉ.परवीनकुमार सेलूकर,नांदेड जिल्हाध्यक्ष कॉ.अंबादास भंडारे,नांदेड जिल्हाउपाध्यक्ष कॉ.उमाकांत सुर्यवंशी,जिल्हामहासचिव कॉ.प्रा.देविदास इंगळे,प्रहार चे देगलूर तालुकाअध्यक्ष कैलास येसगे,वंचितचे ज्ञानेश्वर चिंतले, तानाजी पाटील बळेगावकर,सिद्धार्थ ढवळे, भारतीय स्टुडंट्स फेडरेशन चे देगलूर तालुका संघटक कॉ.यादव भुयारे, भारतीय मोटार वाहन संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष कॉ.आनंद खानापूरकर,प्रा.यशपाल गवाले,मानवी हक्क अभियानाचे गंगाधर भुयारे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.