राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिला आईच्या स्मृतींना उजाळा

    43

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(दि.17मार्च):-
    माझी सुद्धा होती आई ;
    नाव तिचं होतं हौसाबाई;
    पण तिने जाण्याची केली घाई ;
    आईची आठवण येते ठाई ठाई
    अशी कविता सादर करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आपल्या मातोश्री हौसाआईच्या आठवणींना उजाळा दिला.सांगलीतील मिरज तालुक्यातील इनाम धामणी या गावात राजर्षी शाहू शिक्षण संस्थेतर्फे राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्या सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस चे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.नाना पटोले आणि ना रामदास आठवले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ना रामदास आठवले आपल्या आईच्या आठवणीत रमले.

    मी केवळ 6 महिन्यांचा असताना माझे वडील वारले.त्यामुळे माझ्या आईने इतरांच्या शेतात कष्ट करुन मला वाढविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे मी ही खुप शिकावे असे माझ्या आईला वाटत असे.त्यासाठी तिने खुप कष्ट करून मला संभाळले वाढविले शिकविले आणि घडविले. आईचे उपकार कधीही फिटू शकत नाहीत.असे ना रामदास आठवले म्हणाले.

    कष्टकरून आपल्या मुलांना घडविणाऱ्या मतांचा राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार हा विठ्ठल पाटील यांनी आयोजित केलेला सोहळा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार ना रामदास आठवले यांनी काढले.