टोल नाक्यांवरील स्थानीक मराठी कर्मचाऱ्यांना सौजन्याची वागणूक द्या – वंचितची मागणी

    36

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

    हिंगणघाट(दि.17मार्च) :-राष्ट्रीय महामार्गावरील दारोडा टोल नाक्यावरील स्थानीक कर्मचाऱ्यांना बाहेर राज्यातून आलेल्या टोल व्यवस्थापकांकडून जातीवाचक शिवीगाळ करून खालच्या पातळीची वागणूक दिली जात असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीकडे टोल वरील कर्मचाऱ्यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष डॉ.उमेश वावरे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत टोल नाक्यावर जाऊन टोल व्यवस्थापकांस निवेदन देत स्थानीक मराठी कर्मचाऱ्यांना सौजन्याची वागणूक देत त्यांना कामावरून कमी करू नये अशी मागणी केली.

    गेल्या अनेक महिन्यांपासून या टोल नाक्यावर अनेकजण स्थानिक मराठी कर्मचारी काम करीत आहे. कोरोनाच्या काळात देखील याच कर्मचाऱ्यांनी या टोलनाक्यावर आपला जीव धोक्यात टाकून काम केलेले आहे. मात्र आता बाहेर राज्यातून आलेल्या टोल व्यवस्थापक मंडळीकडून या स्थानिक मुलांना कामावरून काढण्याचा डाव आखला जात आहे. याकरिता काही स्थानिक कर्मचाऱ्यांना टरमिनेशनचा बॉण्ड भरून द्या अशी जबरदस्ती केली जात आहे. या मुलांना जातीवाचक शिवीगाळ देखील केली जात आहे असं स्थानिक टोल कर्मचाऱ्यांनी वंचितकडे दिलेल्या निवेदनातून सांगितलं आहे. यावेळी वंचितचे डॉ उमेश वावरे यांनी टोल नाक्यावरील व्यवस्थापनास निवेदनाद्वारे जातीवाचक शिवीगाळ करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला जाईल अशी चेतावणी दिली आहे. बाहेर राज्यातून आलेली टोल व्यवस्थापक मंडळी स्थानिक वाहनचालकांना त्रास देत आहे.

    वेगवेगळ्या प्रकारे टोलवर आर्थिक लूट केली जात आहे. स्थानिक युवकांना बेरोजगार करण्याची योजना या टोल व्यवस्थापनाकडून आखली जात असून बाहेर राज्यातील आपल्या हिताची मंडळी टोलनाक्यावर आणण्याचा त्यांचा डाव आहे, मात्र वंचितच्या या चेतावणी नंतर आता टोल व्यवस्थापन स्थानिक कर्मचाऱ्यां विरोधात असे कट-कारस्थान करतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    यावेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश खानकुरे, शहराध्यक्ष दिलीप कहूरके, मनीष कांबळे, चारुदत्त आटे, हर्षल कुंभारे, आकाश फूलमाळी, प्रजित थुल, अखिल आत्राम, सुनिल करपाते, गणेश आत्राम, प्रणित कांबळे, गणेश शेडके, कुंदन कुंभारे, प्रणय ढोके, संजय जामनकर, निखील कळसकर, निखील उमरे, प्रज्वल तामगाडगे, वैभव कुंभारे, सुरज बेताल, साहील जारोंडेसह कार्यकर्ते उपस्थित होते.