आमदार प्रतिभाताई धानोरकरांच्या हस्ते वरोरा येथे लसीकरण केंद्राचे उदघाटन

29

🔹जेष्ठ नागरिक तथा दीर्घकालीन आजारी रुग्णांकरिता लसीकरण मोहिमेस प्रारंभ

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.18मार्च):- वरोरा येथील ट्राम केअर युनिट येथे कोविड १९ साथीरोगावर नियंत्रण करिता जेष्ठ नागरिक तथा आजारी रुग्णा करीत आजपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या लसीकरण कक्षेचे उदघाटन लोकप्रिय महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, उपविभागीय अधिकारी शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश राठोड, तहसीलदार प्रशांत बेडसे, डॉ. बाळू मुजनकर, सुभाष दांदडे, बंडू देऊळकर यांची उपस्थिती होती.

कोविड १९ या साथीरोगावर नियंत्रण करण्याकरिता वरोरा येथील जेष्ठ नागरिक ताथा दीर्घ कालीन आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना कोविड १९ या साथीरोगापासून बचाव करण्याकरिता दैनंदिन ५०० ते ७०० लस देण्याचे उद्दिष्टये ठरविले आहे. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर व नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी संपूर्ण लसीकरण केंद्राची व लस घेणाऱ्या नागरिकांकरिता करण्यात आलेली व्यवस्था बघून समाधान व्यक्त केले तसेच समस्त वरोरा येथील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने वय मर्यादा ४५ ते ५९ दीर्घकालीन आजार व वयोमर्यादा ६० पेक्षा वरील वयोगटातील समस्त जनतेला लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.