बांधकाम कामगाराचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढा

38

🔺अन्यथा १५ दिवसानंतर जिल्हाधिकारी नांदेड येथे तिव्र आंदोलनाचा इशारा

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.18मार्च):-बांधकाम कामगारांचे विविध प्रकारचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावा.व तसेच कामगार साहित्य पेटी हदगांव येथे वाटप करण्यात यावे. या करीता जिल्हाधिकारी नांदेड व सहाय्यक कामगार आयुक्त अविनाश देशमुख व संबंधित अधिकारी यांना एकता बांधकाम कामगार संघटना हदगांव च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
व तसेच बांधकाम कामगारांचे आॅन लाईन नविन व नुतणीकरण अर्जाची पडताळणी न केल्याने बांधकाम कामगार हे विविध शासकिय योजने पासुन वंचित आहे. आणि काही बांधकाम कामगारांचे आॅन लाईन नविन नोंदणी व नुतणीकरण अर्जाला जाणुन बुजून त्रुटी काढत असल्याने व तसेच पात्र अर्जाला प्रलंबित ठेवत असल्याने बांधकाम कामगारांचे कोणतेही योजनेचा लाभ मिळत नाही.

व तसेच हदगांव तालुका हा विशालमय आणि तालुक्यातील सर्व गावे दुर असल्याने व तसेच या तालुक्यातील सर्वात जास्त व्यक्ती हा बांधकाम कामगार व ईतर कामगार वर्ग असल्याने पात्र बांधकाम कामगाराला साहित्य पेटीसाठी अनेक दिवस कामगार कल्याण मंडळात चकरा मारुनही साहित्य पेटी मिळत नसल्याने कामगारांना मानसिक, शारिरीक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. व तसेच किरकोळ कामासाठी कामगार कल्याण मंडळात सतत वारंवार चकरा माराव्या लागतात आहे. त्यामुळे कामगाराचे रोजगार बुडत असल्याने बांधकाम कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. या करीता एकता बांधकाम कामगार संघटना हदगांव यांनी एका निवेदनाद्वारे संबंधित सर्व अधिकारी यांना देण्यात आले आहे. अन्यथा कोरोणा संकट काळात १५ दिवसा नंतर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एकता बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष शेख हमीद उपाध्यक्ष शेख समद सचिव सुरज सोनुले सह सचिव कुबेर राठोड मार्गदर्शक तथा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल, शेख महेमुद, दिपक सोनुले, सादिक पटेल, वाजिद पठाण यावेळी उपस्थित होते…