वणा नदी काठावरील पंपगृह सील करून पाणीपुरवठा केला बंद

    32

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

    हिंगणघाट(दि.१८मार्च):-राष्ट्रीय महामार्गावरील वणी येथील सुगुणा फुड्स कंपनीने पाणीपट्टीची एक कोटीची थकबाकी न भरल्यामुळे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे आदेशान्वये जलसंपदा विभागाने वणा नदी काठावरील पंपगृह सील करून पाणीपुरवठा बंद केला.सुगुणा कंपनीने जलसंपदा विभागाची एक कोटीची थकबाकी वेळोवेळी सूचना देऊनही भरली नाही. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाणीप्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ कलम ३३ (अ) व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा १९८१ कलम ३१ (अ) नुसार प्रदूषण नियंत्रणात त्रुट्या आढळूनआल्यामुळे पंपगृह सील करून पाणीपुरवठा बंद करण्यात आलाआहे.

    यापुढे बिगर सिंचन पाणी वापर संस्थांनी अथवा पाणी उचल करणाऱ्या उद्योगांनी वेळेवर पाणीपट्टी न भरल्यास त्यांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे. सदर कारवाई कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अभियंता श्रीराम कावळे, शाखाधिकारी एच. कुलकर्णी, कालवे निरीक्षक रमेश कुंभलकर, मुकदम आनंद लोणकर, सुगुणाचे व्यवस्थापक राहूल वैरागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.