साई ज्वेलर्स येथे चोरट्यांनी ३ लाख ५० हजार रुपयांचे सोनेचांदीचे दागिने लांबविले

30

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.१८मार्च):-शहरातील गोलबाजार परिसरातील साई ज्वेलर्स येथे अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ५० हजार रुपयांचे सोनेचांदीचे दागिने लांबविल्याची घटना बुधवारी रात्री घडली.आज सकाळी १० वाजता साई ज्वेलर्सचे मालक सोमनाथ सदाशिव लोंढेकर हे दुकान उघडण्यास गेले असता दुकानात चोरी झाल्याची बाब उघड़किस आली.यासंबधी सोमनाथ सदाशिव लोंढेकर यांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.घटनेच्या दिवशी रात्रीचे सुमारास चोरट्यानी साई ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानाची मागची भिंत फोडून दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांना दुकानात शिरता आले नसल्याने चोरट्यांनी बाजूलाच असलेल्या कापडाच्या दुकानाची भिंत फोडून कापडाचे दुकानात प्रवेश मिळविला. येथिल वरच्या छपराची टिन वाकडी करून साई ज्वेलर्स या दुकानात प्रवेश केला.यावेळी त्यांनी या दुकानातील पीओपीचीसुद्धा तोड़फोड़ केली.साई ज्वेलर्स येथे प्रवेश करीत दिड कीलो चांदी, ६० ग्रॅम सोन्याचे दागिने, ४० हजार रुपये किंमतीचे बेन्टेक्सचे दागीने असे एकूण ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला.ज्वेलरी दुकानाचे संचालक सोमनाथ सदाशिव लोंढेकर रा.इंदिरा गांधी वार्ड यांच्या तक्रारीवरुन ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे हे घटनेचा तपास करीत आहे.