लव्हे येथील तलाव भरला 100 टक्के

23

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.20मार्च):-दहिगाव उपसा सिंचन चालू झाल्यापासून बर्याच दिवसांनंतर लव्हे येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. याचे श्रेय आमदार मा.संजयमामा शिंदे यांना जाते. दहिगांव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून प्रथमच तलाव १०० टक्के भरल्याबद्दल लव्हे ग्रामस्थांतर्फे मामांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्केट कमिटीचे संचालक मा.चंद्रकांतकाका सरडे, मा.तानाजीबापू झोळ, पै.मा.चंद्रहासबापू निमगिरे, युवक नेते मा.दादासाहेब पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.