शर्माजी की बैठक मध्ये मिळतो मोफत माक्स

33

🔸राजू शर्मा यांचे होत आहे कौतुक

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.20मार्च):-कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्न करत आहेत, यात काही सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी व्यक्ती आपआपल्या पद्धतीने सहकार्य करताना दिसत आहेत, याच अभियानातील एक भाग म्हणून चिमूर येथील “शर्माजी की बैठक” या हाटेलचे संचालक राजू शर्मा यांनी आपल्या ग्राहकांना मोफत माँक्स देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

कोविड19 या आजारावर काळजी घेणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे सर्वत्र सांगितले जाते, त्याप्रमाणे काही प्रमाणात जनता शासन व प्रशासनाला सहकार्य करीत असली तरी काही व्यक्ती माहितीच्या अभावाने दुर्लक्ष करताना दिसत आहेत.कोरोना या समस्येवर उपाययोजना म्हणून सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो अशी प्रतिक्रिया राजू शर्मा यांनी दिली.शर्मा परिवाराने यापूर्वी “पाणपोई” सारखे उपक्रम राबविले आहेत. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मोफत माक्स वाटप उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.