कुर्डुवाडी पोलीसांचा अजब कारभार-आमदाराला एक आणि सर्व सामान्याला दुसरा कायदा

26

🔹आमदार बबन दादा शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करा:अतुल खूपसे पाटील यांची मागणी

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.20मार्च):-पोलीस स्टेशनचा कारभार म्हणजे खऱ्याचे खोटे व लबाडाचे तोंड मोठे या वाक्याच्या अर्थबोधाप्रमाणे सुरू आहे. या गोष्टीची प्रचिती दिनांक 18 मार्च रोजी माढा तालुक्यातील जनतेला आली. मनसेच्या वतीने वीज प्रश्नासाठी कुर्डूवाडी टेंभूर्णी रोडवर अंबड येथे रास्ता रोको करण्यात आला.या आंदोलनात 50 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता .या आंदोलनाचे श्रेय मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळू नये यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी आंदोलनात सहभाग घेऊन याप्रश्नी शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवली. आंदोलन समाप्त झाल्यानंतर कुर्डूवाडी पोलीस स्टेशन यांचेकडून मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांचेसह 15 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र आमदार बबनदादा शिंदे यांना क्लीन चिट देण्यात आली .हा कुर्डूवाडी पोलीस स्टेशन चा कुठला न्याय. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची प्रवृत्ती कुर्डूवाडी पोलीस स्टेशन ने थांबावावी.

गुन्हा दाखल करायचाच असेल तर आमदार शिंदे यांच्यासह मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्वरित मागे घ्यावे .अन्यथा सदर चा खोटा गुन्हा मागे न घेतल्यास कुर्डूवाडी पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे .या निवेदनाच्या प्रती त्यांनी गृह मंत्र्यांसह वरिष्ठांना पाठवल्या आहेत.