मौकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नर हरण अपघातात गंभीर जख्मी

30

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगांव(दि.20मार्च):-दि.१९ रोजी नॅशनल हायवे क्रमांक ६ रावण टेकडी समोर एका नर हरणाच्या मागे काही मौकाट कुत्रे लागल्यामुळे नर मादा आपला जीव वाचविन्यासाठी रस्ता ओलांडत असतांना ११:२० ला अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जख्मी अवस्थेत कोसळलेला तड़फड़त होता ही धडक इतकी भयंकर होती की नर हरणाचे दोन्ही पाय तूटून पडून निकामी झाले होते.

घटनेची माहिती १२:४५ मिळताच एकनिष्ठा फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव, गोलु आठवले, शाम देशमुख, गोपाल पाटील आदि लोकांनी वन विभागाला फोन द्वारे माहिती दिली असता वन कर्मचारी मंडले हे घटना स्थळी आले त्यांना सोबत घेऊन पशु वैद्यकीय दवाखान्यात नेऊन डॉ. आर बी फिरके, व पाटील यांनी उपचार केले उपचार झाल्यानंतर एकनिष्ठा फाउंडेशन तर्फे वनविभाग कार्यालयमध्ये वनरक्षक गोपाल पालवे यांच्या स्वाधीन करून दिले. अशी माहिती सुरजभैय्या यादव यांनी दिली.