पुनर्वसन न करता FSI चा घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी विकासक विमल शहाला अटक करा – डॉ. राजन माकणीकर

32

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.20मार्च):-अंधेरी एम.आय.डी.सी पॉकेट क्रमांक-२, शांती नगर परिसर आणि पॉकेट क्रमांक-६ महेश्वरी नगर परिसराची जागा पुनर्वसन झोपड्या हटवण्याआधीच विकासक विमल शहा या विकासकाने FSI चा फायदा घेऊन एम.आय.डी.सी प्रशासनाची फसवणूक आहे त्यामुळे विकासक व साथीदार मुरजी पटेल वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत एमआयडीसी ने तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबिरासाठी जागा दिली होती, परंतु; विकासक विमल शहा ने सदरची मोकळी जागा परत न करता इमारती बांधून FSI ची विक्री केली आहे.

ही एवढी मोठी अफरातफरी चालू असतांना एमआयडीसी चे संबंधित तत्कालीन अधिकारी यांनी कानाडोळा का केला असावा(?) यात अधिकाऱ्यांनी पण आपले हात मळवले आहेत की काय ?? याचाही तपास होणे अति महत्वाचे असून संबंधित अधिकारी, विकासक विमल शहा व या सर्व प्रकरणाचा मास्टर माईंड महादलाल मुरजी पटेल याची चौकशी होणे गरजेचे आहे.

पॉकेट क्रमांक २ आणि ६ च्या जागेचे पुनर्वसन करून संक्रमण शिबिरासाठी दिलेली जागा परत मिळवून विकासक व महादलाल मुरजी पटेल वर फसवणूक व अफरातफरी चा गुन्हा नोंदवावा. अशी मागणी राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर व राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रारी अर्जाद्वारे केली आहे.

सदर प्रकरणी मागील महिन्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र; वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे व एमआयडीसी SRA प्रकल्पचे प्रमुख संतोष करंडे यांनी प्रकरणावर कारवाईचे अस्वासन देऊन कोविड मुळे मोर्चा ऐवजी शिष्टमंडळाने भेट घेण्याची विनंती केली होती, त्यानुसार शिस्तमंडलने भेट घेतली परंतु आजही परिस्तिती जैसे ठे असल्यामुळे पुन्हा मोर्चा चे आयोजन करणार असल्याची माहिती डॉ. राजन माकणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली, शिवाय ३० एप्रिल पर्यंत योग्या ती कारवाई झाली नसल्यास आत्मदहानाचा इशारा आधीच दिलेला असल्याचीही त्यांनी आठवण करून दिली.