विद्युत लोकपाल नागपुर यांच्याकडुन महावितरण कार्यालय शेगाव यांना दणका

    120

    ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

    शेगांव(दि.22मार्च):-शहरातील इंदिरा नगर येथील रहिवाशी महावितरणचे विज ग्राहक श्री. राहुल समाधान खंडेराव यांनी माहे आॅगस्ट 2019 चा विज देयकाचा भरणा न केल्यामुळे महावितरण कडून ग्राहकाला 1-8-2019 रोजी विज अधिनियम 2003 कलम 56 नुसार नोटीस पाठविण्यात आली माञ सदर नोटीस चा पंधरा दिवसाचा कालावधी पुर्ण न झाल्यामुळे 13-8-2019 महावितरण कार्यालय शेगांव कडुन दोन दिवस अगोदर विज पुरवठा खंडीत करण्यात आला त्यामुळे ग्राहकाने महावितरण अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कक्ष बुलढाणा यांच्याकडे 18-1-2020 रोजी तक्रार दाखल केली माञ ग्राहकाचा अर्ज अमान्य करण्यात आली.

    त्यामुळे ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण मंच अकोला येथे तक्रार दाखल केली माञ सदर मचाने निकाली काढली माञ सदर ग्राहकाने हार न मंचाने दिलेल्या निर्णयाने व्यथीत होवुन विघुत लोकपाल नागपुर यांच्याकडे तक्रार दाखल केली .विघुत लोकपाल यांनी दोन्ही पक्षाकडील युक्तीवाद व कागदपञे यांचे अवलोकन करण्यात आले विघुत लोकपाल यांच्याकडुन ग्राहक प्रतिनीधी श्री . अंबादास पवार यांना विचारणा करण्यात आली विज पुरवठा खंडीत होण्यापुर्वी पाच महिने व खंडीत केल्यानंतर 8 महिने विघुत देयक भरणा केलेला नाही आपणास किती नुकसान भरपाईची अपेक्षा आहे यावेळी ग्राहक प्रतिनीधी यांनी आम्हाला त्यात अजिबात स्वारस्य नाही .महावितरण कर्मचारी यांची ग्राहकाप्रती असलेली वागणूक अंत्यत तुच्छ व मानहानी पुर्ण असते त्यास चाप बसावा हा प्रमुख उद्देश आहे.

    तसेच ग्राहकाने विज पुरवठा खंडीत केल्यानंतर 8 महिने विज देखकाचा भरणा केला नाही त्यामूळे नुकसान भरपाईस पाञ नाही .तरीपण महावितरण कार्यालय शेगांव उपकार्यकारी अंभियता यांनी नियमाचे पालन न केल्यामुळे ग्राहकास 1000 रुपये व खर्चापोटी 500 रुपये असे एकुण 1500 रुपये ग्राहकास देण्याचे मा. विघुत लोकपाल नागपुर यांनी आदेश दिले ही रक्कम ग्राहकाच्या येणार्‍या मासिक विज देयकातुन समायोजित करण्यात यावे असे आदेश पारित केले महावितरणकडून उपअंभियता शेगांव यांनी आपली बाजु मांडली तर ग्राहकाच्या वतीने महाराष्ट्र विज ग्राहक संघटना शेगांव तालुका अध्यक्ष श्री . अंबादास पवार यांनी बाजु मांडली