पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग नालीचे काम निकृष्ट दर्जाचे

29

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

पाटोदा(दि.21मार्च):- शहरातुन जात असलेला पैठण ते पंढरपूर हा पालखी मार्ग 15 ते 20 वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्षात या रस्त्याचे काम 3 ते 4 वर्षांपासून चालू आहे. काम चालू असलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रारी केल्या आहेत. पंरतु या रस्त्याचे काम करीत असलेल्या तिरुपती कँन्ट्रक्शन कंपनीने आपल्या मनमानी कारभार करीत अत्यंत निकृष्ट काम केलेले आहे.

परंतु आज दि.21 मार्च रोजी विजापूर येथुन खत घेऊन आलेल्या ट्रक क्रं.𝐌 𝐇 16 𝐀 𝐘 2020 हा माल खाली करण्यासाठी आज सकाळी 6 वा हैदराबाद बँकेच्या शेजारीच असलेल्या गोदामात जात असताना गुत्तेदाराच्या निकृष्ट केलेल्या नालीच्या पुलावरचा स्लँब कोसळून ट्रकचे पुढचे चाक हा पुर्णपणे नालीमध्ये गेला आहे.तब्बल 5 तासापर्यत याकडे या रस्त्याचे काम करीत असलेल्या तिरुपती कँन्ट्रक्शन कंपनीचे कोणीही आलेले नव्हते. ट्रक बाहेर काढण्यासाठी ड्रायव्हर व त्याचा हेल्पर हे परीश्रम करीत होते. या दुर्घटनेत ट्रकचे कमीतकमी 30 ते 40 हजाराचे नुकसान झाले आहे.

नितिन गडकरी केंद्रीय मंत्री, प्रधान सचिवांना तक्रार:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी करण्यात येऊन संबधित ठेकेदार-प्रशासकीय आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, प्रधान सचिव, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना तक्रार करण्यात आली आहे.