आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणूक ताकतीने लढविन्यासाठी गट बांधनी मजबूत करावी – चंद्रकांत खंडाईत

    34
    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण)मोबा.9075686100

    म्हसवड(दि.22म्हसवड):-जिल्ह्या,मध्ये आगामी काळात येणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पूर्ण ताकत लावून लढविणार असून यामध्ये मोठे यश मिळविणार आहे .त्यासाठी निवडणूकपूर्व नियोजन करण्यासाठी तालुका निहाय बैठका सुरू असून त्याचा एक भाग म्हणून माण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रेस्ट हाऊस दहिवडी येथे घेणेत आली यावेळी जिल्हाध्यक्ष खंडाईत यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना खंडाईत यांनी सांगितले की गट निहाय, गण निहाय बांधणी करण्याचे ठरले असून वचितच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताक्तिनिशी काम करायचे आहे.आणि वंचित ला यश मिळवुन द्यायचे आहे.

    यावेळी जिल्हाध्यक्ष खंदाईत,बाळासाहेब देसाई,पाटील यांचा पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी युवक आघाडीचे सनी तुपे यांनी सांगितले की कुकुडवाड विभाग चे कार्यालय पुढील आठवड्यात वडजल याठिकाणी सुरू करत असून विभागातील सर्व गावांमध्ये पक्षाच्या शाखा उघडू आणि पक्ष मजबूत करणार आहे म्हणाले.बैठकीस माजी सभापती बाळासाहेब रणपिसे,तालुका अध्यक्ष युवराज भोसले,युवक आघाडीचे सनी तुपे,सह सरचिटणीस बंटी खरात,अशोक पवार,निखिल कुंभार,शरद शिंदे हे कार्यकर्ते उपस्थित होते.